Shani-Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि राहूला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा न्यायदेवता आहे. तर राहू हा मायावी सावलीचा ग्रह मानला जातो. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला शुभ आणि अशुभ फळ देतो. शनि आणि राहू हे दोन्ही अतिशय संथ गतीने आपली स्थिती बदलतात. शनिदेव हा अडीच वर्षांनी तर राहू 18 महिन्याने आपली रास बदलतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून 15 मार्चपासून शनीने शतभिषा नक्षत्रात आहे. तर शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू असल्याने शनिदेव आणि राहुच्या युतीने खतरनाक योग तयार झाला आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत 5 राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. (saturn and rahu yuti shatabhisha nakshatra these 5 zodiac sign faces problems till 17 october)
या राशीच्या लोकांसाठी शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश अतिशय घातक आहे. या काळात जीवनात चढ-उतार पाहावे लागणार आहे. आर्थिक अडचणींमुळे मन अस्वस्थ असेल. त्यामुळे मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी योग्य संवाद ठेवणे तुमच्या हिताचे होईल अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात गुंतवणूक टाळा.
या राशीसाठी हा योग अत्यंत धोकादायक आहे. यावेळी, व्यक्तीला आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित निर्णयांबाबत विशेष सावध राहवं लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शनीच्या प्रभावाखाली शिक्षणात अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. कर्जाचा दबाव वाढणार आहे.
शनि आणि राहूच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्ता, आरोग्य आणि वैयक्तिक जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीचे निरीक्षण करणं गरजेचं आहे. नात्यात चढ-उतार पाहिला मिळेल. यासोबतच तुमच्या मान-सन्मानाच्या बाबतीतही समस्या निर्माण होणार आहे. प्रवासातही विशेष खबरदारी घ्यावी लागेल आहे, कारण अपघाताचा धोका आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा काळ चढ-उतार आणि मानसिक तणावाने भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. आरोग्याच्या समस्यांवर पैसे खर्च होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होणार आहे. जोडीदाराशी वाद होऊन नात्यात तणाव निर्माण होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहूचा युती खूप वादग्रस्त ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आपल्या सभोवतालच्या लोकांशी देखील काळजीपूर्वक वागावे. या काळात तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)