Saraswati Puja 2024 : आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून आज वसंत पंचमी (Vasant Panchami) साजरी करण्यात येत आहे. आज प्रेमाचा दिवसही असून आपण जोडीदाराला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा करणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर बसंत पंचमीच्या दिवशी रवियोग, शुक्ल योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. (Saraswati Puja 2024 Amazing Coincidence of Saraswati Puja on Vasant Panchami 14 february 2024 this zodiac sign get money)
वसंत पंचमी मेष राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरणार आहे. या लोकांच्या प्रयत्न पूर्ण करण्याचा दृढनिश्चय यांना यश प्राप्त करण्यात मदत करणार आहे. बसंत पंचमीच्या निमित्ताने करिअरच्या प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होणार आहे. सामाजिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणार आहात. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशांशी संबंधित अनेक संधी मिळणार आहे.
वसंत पंचमी सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद वाढणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. बसंत पंचमीमुळे तुमचा धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे, लव्ह लाईफमधील आनंदी असणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमी लाभदायक ठरणार आहे. या लोकांची प्रतिकारशक्ती मजबूत होणार आहे. तुम्हाला गुंतवणूक किंवा जमीन खरेदीतून लाभ होणार आहे. सरस्वती पूजेमुळे घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख नांदणार आहे.
वंसत पंचमी या राशीच्या लोकांसाठी चांगली सिद्ध होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित स्त्रोताकडून अचानक लाभ होणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल उत्तम नोकरीची संधी आहे. या राशीच्या लोकांनी व्हॅलेंटाइन डे नातं मजबूत करणार ठरणार आहे. अचानक आर्थिक लाभामुळे व्यापारी आनंदी असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी वंसत पंचमी भाग्यशाली ठरणार आहे. परदेशातून पैसे कमावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यातील सर्व संकट दूर होणार आहे. मेहनतीच फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहे. मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)