Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला शनीदेवाची बसरणार कृपा, 3 राशींच्या लोकांचे होणार भाग्योदय

Chaitra Sankashti Chaturthi 2023 : आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. सूर्य गोचर (Shani Gochar 2023), चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि शनिवार...म्हणजे शनीदेव आणि विघ्नहर्त्याची एकत्र पूजा करण्याचा दिवस. त्याशिवाय आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आज काही राशींच्या लोकांचे भाग्योदय होणार आहे. 

Updated: Mar 11, 2023, 07:41 AM IST
Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला शनीदेवाची बसरणार कृपा,  3 राशींच्या लोकांचे होणार भाग्योदय title=
Sankashti Chaturthi 2023 Shani Gochar 2023 these Zodiac Signs Get More Money Astrology news in marathi

Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी (shani sankashti chaturthi)  आणि शनीदेव यांना एकत्र प्रसन्न करण्याचा शुभ योग...आजच्या दिवशी शनिदेव महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनि मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा आणि शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. तर दुसरीकडे आज चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी (Chaitra Sankashti Chaturthi 2023)...म्हणून याला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असंही (Bhalchandra Sankashti Chaturthi 2023) म्हणतात. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा शुभ काळ आणि चंद्रोदयाचा काळ जाणून घ्या. (Sankashti Chaturthi 2023 Shani Gochar 2023 these Zodiac Signs Get More Money Astrology news in marathi)

संकष्टी चतुर्थी मुहूर्त (sankashti chaturthi 2023 shubh muhurat)

चैत्र संकष्टी चतुर्थी सुरू - 09:42 रात्री (10 मार्च 2023, शुक्रवार)

चैत्र संकष्टी चतुर्थी संपेल - रात्री 10:05 (11 मार्च 2023, शनिवार)

चंद्रोदय वेळ- रात्री 10:03 

या राशींच्या लोकांचं भाग्योदय (Lucky Zodiac Signs)

सिंह (Leo)

तुमच्या कामाचं फळ मिळणार. नवीन नवीन संधी प्राप्त होणार. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यशाली असणार आहे. शेअर मार्केट आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे अनेक मार्ग मिळतील. आर्थिक स्थिती सुधारणा आहे. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोक नवीन लोकांना भेटणार आहे. भविष्यात या ओळखीचा फायदा होणार आहे. उद्योगपतींना धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. 

संकष्टी चतुर्थी व्रत

आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचं व्रत घ्यावं. यानंतर गणेशमूर्ती पूजा करावी. सर्वप्रथम आचमन पाण्याने भरा. यानंतर फुलं, हार, रोळी, अक्षत, दुर्वा गणरायाला अपर्ण करा. गणरायला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा. दिवसभर उपवास ठेवा. रात्री चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्यावं. आणि व्रत सोडावे . गणरायाला मोदक खूप प्रिय आहे तर मोदक नैवैद्यात दाखवावे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)