Roti Astro Remedies : अमाप संपत्ती हवी आहे? मग शिळ्या पोळीपासून करा 'हे' सोपे उपाय

Roti Astro Remedies : अनेक वेळा शिळ्या पोळा किंवा चपाती राहिली की आपण ती फेकून देतो. पण आता असं करु नका. कारण या शिळ्या पोळीमध्ये तुमचं नशीब बदलविण्याची ताकद असते. ज्योतिषशास्त्रात श्रीमंत होण्यासाठी शिळ्या पोळीचे उपाय सांगितले आहेत. 

Updated: Feb 19, 2023, 02:00 PM IST
Roti Astro Remedies :  अमाप संपत्ती हवी आहे? मग शिळ्या पोळीपासून करा 'हे' सोपे उपाय title=
Roti Astro Remedies stale bread get immense wealth money Poli Chapati astro tips in marathi

Roti Astro Remedies : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे अमाप पैसा असावा. सगळ्या सुखसोयी मिळाव्यात. आपण पण परदेशवारी करावी, ब्रँडेड कपडे आणि वस्तू घ्यावात. पण हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आपले कुंडलीतील ग्रह कमजोर असेल तर आर्थिक चणचण जाणवते. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण ज्या एका पोळीने आपलं पोट भरलं जातं. तिच पोळी आपल्या घरातील तिजोरीही पैशांनी भरु शकते. होय, अगदी बरोबर...ज्योतिषशास्त्रात शिळ्या पोळीबद्दल उपाय सांगण्यात आला आहे. त्यामुळे यानंतर जर घरात शिळी पोळी राहिली असेल तर ती फेकू नका. चला जाणून घ्या एक पोळी तुमचं नशीब कसं उजळवेल. (Roti Astro Remedies stale bread get immense wealth money Poli Chapati astro tips in marathi)

शिळ्या पोळीचे उपाय (Roti Ke Jyotishiya Upay)

  1.  जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु दोष असेल तर त्या व्यक्तीने चपातीवर मोहरीचे तेल लावावे आणि ते रोज काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे. असं केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील राहू दोष संपतो आणि शनिदेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. 
  2. शनीची सातेसाडी किंवा धैया चालू असल्यास अमावस्या किंवा आठवड्यातील कोणत्याही शनिवारी गायीला दोन शिळ्या आणि खीर खाऊ घाला. असं केल्याने शनिदेवाचा प्रकोप कमी होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. 
  3. नवीन ग्रहांच्या शांतीसाठी आणि प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी पक्ष्यांना पाच शिळ्याचे लहान तुकडे करून खायला द्या. असं केल्यानं नऊ ग्रह शांत होतात आणि प्रगतीत येणारे अडथळेही दूर होतात, शास्त्रात मानलं जातं. 
  4. रोज एक शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खायला द्या. या उपायाने कौटुंबिक संकट दूर होतात आणि घरात शांती राहते.
  5. पहिली पोळी ही गाईला खाण्यासाठी द्या. ज्योतिष शास्त्रानुसार असं केल्यानं घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.
  6. पोळीला थोडासा गूळ लावा आणि रोज गायीला खाऊ घाला. असं म्हणतात की, हे केल्याने वैवाहिक नात्यात नेहमी गोडवा राहतो आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)