Ravi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत

Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज  लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 16, 2023, 09:50 PM IST
Ravi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत  title=
Ravi Yoga 2023 in navratri tuesday 17 october wealth on people of 5 signs zodiac

Ravi Yoga 2023 : मंगळवार 17 ऑक्टोबरला नवरात्रीची तिसरी माळ आहे. या दिवशी माता दुर्गेची तिसरी शक्ती चंद्रघंटाची पूजा केली जाणार आहे. पंचांगानुसार चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे. चंद्र आणि मंगळामुळे लक्ष्मी योग आहे. बुध आणि सूर्यमुळे कन्या राशीत बुधादित्य योग त्याशिवाय रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे मंगळवार हा पाच राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. (Ravi Yoga 2023 in navratri tuesday 17 october wealth on people of 5 signs zodiac)

वृषभ (Taurus Zodiac) 

17 ऑक्टोबरचा दिवस खूप शुभ आणि फलदायी आहे. शत्रूंवर मात करण्यास अयशस्वी व्हाल. तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये गुंतलेले असाल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. कार्यक्षेत्रात यश मिळेल. शारदीय नवरात्रीमुळे धार्मिक कार्यात रुची वाढेल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळले. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार असून आर्थिक फायदा होईल. 

मंगळवारचा उपाय :  मंगळाची स्थिती मजबूत करण्यासाठी लाल वस्त्र परिधान करा किंवा लाल वस्त्र सोबत ठेवा. तसंच हनुमानजींना लाल फुलं अर्पण करा.

कर्क (Cancer Zodiac)  

17 ऑक्टोबरचा दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे.  नशिबाची साथ मिळाल्यामुळे सर्व कामे मार्गी लागणार आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता विकसित होणार आहे. पालकांना मुलांच्या कर्तृत्वाची चांगली मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे.  तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

मंगळवारचा उपाय :लाल रंगाचे कपडे परिधान करा. तसंच हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करा.

कन्या (Virgo Zodiac) 

17 ऑक्टोबरचा दिवस या राशीच्या लोकांसाठी अनुकूल आहे. या लोकांना आदर आणि मान्यता लाभणार आहे. नोकरदार लोक दीर्घ सुट्टीसाठी नियोजन करणार आहे. प्रेम जीवनातील नातेसंबंध मजबूत होईल. नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रगतीसोबत आर्थिक लाभ मिळेल. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला तुमच्या काही कामाबद्दल प्रशंसा मिळणार आहे. 

 मंगळवारचा उपाय :  हनुमानजीसमोर पाण्याचे भांडे ठेवा आणि 21 दिवस हनुमान बाहुकचा पाठ करा. दररोज पाठानंतर पाणी सेवन करा आणि दुसऱ्या दिवशी दुसरे पाणी ठेवा.

हेसुद्धा वाचा - Diwali 2023 : दिवाळीपूर्वी 'या' लोकांच्या दारात येईल लक्ष्मी, शुक्र-शनिमुळे अमाप पैसासोबत घरात नांदेल सुख समृद्धी

मकर (Capricorn Zodiac)

17 ऑक्टोबरचा दिवस या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.  धैर्य आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. तुमच्या बोलण्याने लोकही प्रभावित होणार आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे.  तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढणार आहे.  17 ऑक्टोबरला नशिब व्यावसायिकांना साथ देणार आहे.  जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे.

मंगळवारचा उपाय :  हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

17 ऑक्टोबरचा दिवस या लोकांना लाभदायक ठरेल.  नोकरदार लोकांना नोकरीची चांगली ऑफर मिळणार आहे.  शारदीय नवरात्रीमुळे मंदिर किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होणार आहे. तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल आणि एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचे सहकार्यही मिळणार आहे. 

मंगळवारचा उपाय :  हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा आणि सुंदरकांडाचा पाठ करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)