Horoscope 14 December 2022 : राशीभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस, कधी व्हायचंय सावध?

Horoscope 14 December 2022 : आज बुधवार. नवा आठवडा सुरु गोऊन आता तोसुद्धा संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशा या आठवड्याच्या मध्यावर तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.   

Updated: Dec 14, 2022, 07:40 AM IST
Horoscope 14 December 2022 : राशीभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस, कधी व्हायचंय सावध? title=
Rashifal daily astro 14 December 2022 know details

Horoscope 14 December 2022 : आज बुधवार. दिवसाची सुरुवात झालीये, काहीजण त्यांच्यात्यांच्या कामासाठी निघाले आहेत. तुम्ही दिवसाची सुरुवात केली असेल किंवा नसेल, तरीही पाहून घ्या काय सांगतं आजचं राशीभविष्य... 

मेष (Aries Horoscope Today)- समाजात तुमच्याप्रती असणारी आदराची भावना वाढेल. आरोग्याच्या सर्व चिंता मिटतील. शत्रू सक्रिय असल्यामुळं सावध राहा. 

वृषभ  (Today Taurus Horoscope)- अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या संधी मिळाल्यामुळं कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. शंकराची पूजा करा. 

मिथुन (Today Gemini Horoscope) - आरोग्याचे सर्व प्रश्न मिटतील. शेजाऱ्यांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. नव्या लोकांची भेट होईल. 

कर्क (Cancer Horoscope Today)- प्रेमाचं नातं आज नव्या वळणावर येणार आहे. आपल्या माणसांची साथ तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल. 

सिंह (Leo Horoscope Today)-  डोकेदुखीच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. आज नोकरीच्या ठिकाणी मोठं पद तुम्हाला देण्यात येईल. 

कन्या (Horoscope Virgo Today)- आज कोणत्याही लहानसहान गोष्टीनं नाराज होऊ नका. कुटुंबाची काळजी घ्या. नवं घर खरेदी करण्याचे बेत आखाल. 

तुला (Libra Horoscope Today)- प्रियजनांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आरोग्याची काळजी आता मिटणार आहे. तरीही सावधगिरी बाळगा. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)- आजपासून पुढे प्रकृती उत्तम राहील. महत्त्वाची आणि ताटकळलेली कामं पूर्ण होतील. मोठ्यांचे सल्ले फायद्याचे ठरतील. 

धनु (Sagittarius Horoscope Today)- कुटुंबातील मोठ्यांची मदत आज मिळणारक आहे. आज शब्द सांभाळून वापरा. आपल्या माणसांची काळजी घ्या. 

मकर (Today Capricorn Horoscope)- कुटुंब कलह दूर होतील. सकारात्मकतेच्या दिशेनं वाटचाल करा. नव्या संधी गमावू नका. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)- महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा. विवाहोत्सुकांसाठी मनाजोगं स्थळ येणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार इतक्यात नकोच. 

मीन (Pisces Horoscope Today)- अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. नोकरीमध्ये यश मिळणार आहे. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)