4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, काय आहे यामागचं कारण?

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Updated: Dec 23, 2021, 09:57 PM IST
 4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, काय आहे यामागचं कारण? title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : प्रत्येक वेळ सारखी नसते. कधी संकटं घेऊन येणारी असते तर कधी आनंद देणारी असते. 12 राशींपैकी येत्या काळात 4 राशींवर गुरु ग्रहाची चांगली कृपा होणार आहे. गुरु ग्रहाचा 4 राशींवर चांगला परिणाम होणार आहे. यापैकी कोणत्या राशींवर प्रभाव होणार आहे जाणून घेऊया. 

कन्या : गुरू राशीचा यावर खास प्रभाव असणार आहे. धानलाभ होणार आहे. कामांत मोठं यश मिळणार आहे. गुंतवणुकीत फायदा होईल. जमीन जुमला प्रॉपर्टीमध्ये फायदा होईल. करियरमध्ये चांगल्या संधी मिळतील.

वृश्चिक : करियरमध्ये चांगलं यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि मजबूत होईल. पैसै कमवण्याच्या नव्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. 

धनु : धनुवर गुरुची जबरदस्त कृपादृष्टी राहणार आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी आहे. आपली स्थिती चांगली होईल. आपल्यासाठी हा कालावधी फायदेशीर असणार आहे. 

कुंभ: एप्रिल 2022 नंतर आपल्यासाठी पुढचा कालावधी उत्तम राहणार आहे. नोकरी-व्यवसाय दोन्ही ठिकाणी परिस्थिती उत्तम राहील. भविष्यात पैशांची चणचण जावणार नाही. बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येईल. 

2022 मध्ये गुरु आपली दशा बदलणार आहे. 13 एप्रिल 2022 पासून गुरु ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा फायदा 4 राशींना होणार आहे. या चार राशींचं भाग्य उजळणार आहे. 

( विशेष सूचना : दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही )