रक्षाबंधन : राखी बांधण्याचा आज शुभ मुहुर्त कोणता ?

आज रक्षाबंधनाचा सण आहे. 

Updated: Aug 26, 2018, 08:24 AM IST
रक्षाबंधन : राखी बांधण्याचा आज  शुभ मुहुर्त कोणता ? title=

मुंबई : आज रक्षाबंधनाचा सण आहे. श्रावण महिना सुरू झाला की सणबाराची रेलचेल सुरू होते. नारळीपौर्णिमेनंतर आज सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह आहे. भावा-बहिणचं नातं अतूट ठेवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. 

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळून, गोडाचा पदार्थ भरवून त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखीच्या प्रतिकात्मक रूपात बंधनाचा धागा बांधला जातो. त्यानंतर आयुष्यभर रक्षण करण्याचे आश्वासन घेतले जाते.  रक्षाबंधनासाठी बनतेय खास 'सोन्या'ची मिठाई, पहा किंमत किती

यंदा कधी साजरी कराल रक्षाबंधन ? 

रक्षाबंधनाच्या सणामध्ये शुभ- अशुभ काळ असे काही नसते. भावा-बहिणीच्या सोयीनुसार हा सण साजरा केला जाऊ शकतो. मात्र काही ज्योतिषाचार्यांच्या सल्ल्यानुसार, रक्षाबंधन रविवार, ( 26 ऑगस्ट 2018) रोजी सकाळी 5.59 ते सायंकाळी 17.25 मिनिटांपर्यंत साजारी करणं फायदेशीर आहे. सूर्योदयाच्या वेळेत राखी बांधणं भावाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात!

भद्रकाळ नाही 

अनेकजण भद्रकाळात चांगल्या गोष्टी करत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ सकाळी सूर्योदयापूर्वीच संपणार आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्ही सोयीनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता.