Rakshabandan: 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला? नेमकी कधी बांधावी राखी जाणून घ्या

ज्या रक्षाबंधनाच्या सणाची बहिणी वर्षभर वाट पाहत असतात, त्या सणाच्या तारखेबाबत यंदा संभ्रम निर्माण झाला आहे. रक्षाबंधनाची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी बातमी नक्की वाचा.

Updated: Aug 9, 2022, 11:02 PM IST
Rakshabandan: 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला? नेमकी कधी बांधावी राखी जाणून घ्या title=

मुंबई : हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) महान सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधते. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. 

रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) सणाची वर्षभर बहिणी वाट पाहत असतात. पण यंदा भद्राची सावली असल्याने तो 11 ऑगस्टला साजरा होणार की 12 ऑगस्टला, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे.

यावर्षी रक्षाबंधन सण 11 ऑगस्ट 2022 रोजी येणार आहे, ज्यामध्ये व्यापिनी पौर्णिमेच्या दुपारी भद्रा दोष आहे. पंचांगानुसार, 11 ऑगस्ट 2022 रोजी सूर्योदयासह चतुर्दशी तिथी असेल आणि या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 10:58 पासून सुरू होईल. यासोबतच भद्रा देखील होईल जी या दिवशी रात्री 08:50 पर्यंत राहील. भद्रकालात श्रावणी सण साजरा करण्यास शास्त्रात निषिद्ध असल्याने रात्री 08.50 नंतरच राखी बांधणे शुभ राहील.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यापूर्वी आंघोळ करून चंदन, अक्षता, दही, मिठाई, शुद्ध तुपाचा दिवा आणि धागा, रेशीम किंवा कापसाची राखी घ्या. यानंतर तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवा. यानंतर भावाला तिलक लावून उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र किंवा राखी बांधावी. यानंतर भावाला मिठाई भरवावी. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.