Raksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण

Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात. 

नेहा चौधरी | Updated: Aug 18, 2024, 03:55 PM IST
Raksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण  title=
Raksha Bandhan 2024 Sisters tie 3 knots while tying rakhi to brother each knot has a special purpose astrology

Raksha Bandhan 2024 : नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन...बहीण भावाच्या नात्याचा हा पवित्र सण मानला जातो. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. यामुळे बहीण भावाचं नात मजबूत होतं आणि भावाच्या दीर्घयुष्यासाठी बहीण प्रार्थना करते. ज्योतिषशास्त्रात राखी बांधताना काही नियम सांगण्यात आलेय. बहिणीने भावाला मनगटावर राखी बांधताना तीन गाठी बांधाव्यात असं शास्त्रात सांगण्यात आलंय. त्या तीन गाठीच शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी या तीन गाठींचं महत्त्व सांगितंलय. (Raksha Bandhan 2024 Sisters tie 3 knots while tying rakhi to brother each knot has a special purpose astrology )

राखी पौर्णिमा तिथी !

मराठी पंचांगानुसार राखी पौर्णिमा तिथी श्रावणातील तिसरा सोमवार 19 ऑगस्ट 2024 ला पहाटे 3.04 ते रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे.

राखी पौर्णिमाला राखी बांधण्याचे नियम!

राखीच्या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी त्याला पाटावर बसवा. या पाटाखाली आणि त्याचा भोवती रांगोळी काढा. आता भावाला कुंकू आणि अक्षता लावा. त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारीने औक्षण करा. त्यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधा. 

हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 99% बहिणी भावाला चुकीच्या बोटाने लावतात टिळा; छोट्या आणि मोठ्या भावासाठी कोणतं बोट योग्य?

भावाचं औक्षण केल्यानंतर राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा. शास्त्रानुसार तीन गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतिक गेलंय. यातील पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी बांधावी. दुसरी गाठ ही बहिणीने आपल्या दीर्घायुष्यासाठी बांधावी. तर तिसरी गाठ ही भावा बहिणीच्या प्रेम आणि गोडवा कायम राहावा यासाठी बांधली जाते. 

हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : चुकूनही 'ही' राखी बांधू नका! भावा-बहिणीच्या आयुष्यावर होतो परिणाम?

भावाच्या प्रगतीसाठी त्याचा राशीनुसार कोणत्या रंगाची राखी शुभ?

मेष (Aries Zodiac) - लाल रंगाची राखी
वृषभ (Taurus Zodiac) - निळा रंगाची राखी 
मिथुन (Gemini Zodiac) - हिरव्या रंगाची राखी
कर्क (Cancer Zodiac) - पांढऱ्या रंगाची राखी
सिंह (Leo Zodiac) - सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची राखी
कन्या (Virgo Zodiac) - हिरवा रंगाची राखी 
तूळ (Libra Zodiac) - पांढरी किंवा सोनेरी रंगाची राखी 
वृश्चिक (Scorpio Zodiac) - लाल रंगाची राखी 
धनु (Sagittarius Zodiac) - पिवळ्या रंगाची राखी 
मकर (Capricorn Zodiac) - निळ्या रंगाची राखी 
कुंभ (Aquarius Zodiac) - निळ्या रंगाची राखी 
मीन (Pisces Zodiac) - सोनेरी, पिवळ्या किंवा हळदीच्या रंगाची राखी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)