मुंबई : उन्हाळ्यानंतर प्रत्येक जण पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असतो. पाऊस म्हणजे श्रावण महिना शंकराचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात हा महिना खूप चांगला मानला जातो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा विविध प्रकारचे पदार्थ खावेसे वाटतात, पण या काळात काही उपाय केले तर घरात सुख-समृद्धी येते. पैशाची कमतरता भासत नाही. याबाबत शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, याच उपयांबद्दल आज जाणून घेऊ...
कर्जातून मिळेल मुक्ती
वास्तूनुसार असे मानले जाते की जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते पावसाच्या पाण्याने लवकर दूर होऊ शकते. साचलेल्या पावसाच्या पाण्यात ग्लासभर दूध मिसळून अंघोळ केल्याने कर्ज लवकर फेडण्याची शक्ती मिळते.
होईल धनलाभ
लक्ष्मीची पूजा पावसाच्या पाण्याने केल्यास धनलाभ धनलाभ होतो, असेही मानले जाते. यासाठी शुक्रवारी पितळेच्या भांड्यात पावसाचे पाणी गोळा करून लक्ष्मीचा जलाभिषेक करावा. तसेच देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करायला विसरू नका.
आर्थिक संकट दूर होईल
अनेकदा आर्थिक विवंचनेमुळे लोक त्रस्त असतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. यासाठी प्रथम पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात भरावे. घागर घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतील असे असे मानले जाते.
नात्यात गोडवा येईल
लग्नानंतर लोकांच्या आयुष्यात अनेकदा दुरावा निर्माण होतो. अशा वेळी नात्यात प्रेम वाढवण्यासाठी काचेच्या बाटलीत पावसाच्या पाण्याने भरा आणि नंतर ही बाटली काही दिवस बेडरूममध्ये ठेवा. ज्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)