Rahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ

Rahu Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. बारा राशीच गोचर करताना प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार फळ देतो. न्यायदेवता शनिदेवानंतर छायाग्रह असलेल्या राहु आणि केतुची जातकांना भीती वाटते. कारण हे दोन्ही ग्रह एकदा मागे लागले की, होणारी कामं देखील होत नाही.

Updated: Dec 25, 2022, 05:54 PM IST
Rahu Gochar: नववर्ष 2023 राहु करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ title=

Rahu Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. बारा राशीच गोचर करताना प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार फळ देतो. न्यायदेवता शनिदेवानंतर छायाग्रह असलेल्या राहु आणि केतुची जातकांना भीती वाटते. कारण हे दोन्ही ग्रह एकदा मागे लागले की, होणारी कामं देखील होत नाही. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. 2022 प्रमाणे नवीन वर्षातही अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. या गोचर स्थितीत पापग्रह राहू 30 ऑक्टोबर 2023 रोजी राशी बदलणार आहे. राहु हा ग्रह उलट्या दिशेने मार्गक्रमण करतो. या दिवशी दुपारी 12.30 वाजता राहु ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या काळात असलेलं अनुकूल ग्रहमानामुळे जातकांना चांगले दिवस येतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल. चला पाहूयात कोणत्या राशींवर असेल राहुची कृपा...

मेष- ज्योतिष शास्त्रानुसार राहूचं गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत बढतीची संधी असून समाजात मान-सन्मान वाढेल.

कर्क- राहूच्या संक्रमणामुळे नवीन वर्षाच्या ऑक्टोबरपासून कर्क राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू लागेल. हा राशी बदल या राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. नवीन वाहन आणि घर खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

बातमी वाचा- Budh Gochar: मकर राशीत होणार बुध ग्रहाची एन्ट्री, 'या' राशींना मिळणार अपेक्षित फळ

मीन- 2023 मध्ये राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीच्या लोकांना या संक्रमणाचा विशेष फायदा होईल. धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. या काळात शुभवार्ताही मिळतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)