Chaturguna Papakartari Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. अशात कुंडलीत ग्रहांच्या स्थिती बदलामुळे कधी शुभ तर कधी अशुभ असे योग तयार होतात. सध्या सर्वात धोकादायक आणि अशुभ असा चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. जेव्हा 4 राशी या 4 पापी ग्रहांच्या मध्ये फसतात तेव्हा हा योग तयार होतो. या योगामुळे चार राशींचं आयुष्य नरक बनणार आहे. (papakartari yoga made after 200 years four zodiac signs will be Trouble)
या राशीच्या लोकांनाही या घातक योगाचा आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागणार आहे. खरं तर लवकरच बुध आणि सूर्याची युती होणार आहे. पण वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे कन्या राशीच्या कुंडलीत एका बाजूला मंगळ आणि दुसऱ्या बाजूला केतू ग्रह आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी येणार आहेत. आर्थिक फटका बसणार असून करिअरमध्ये संकट येणार आहे.
चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या कुंडलीत चंद्र हा मंगळ आणि सूर्याच्या मध्ये सापडला आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे. या लोकांनी प्रत्येक पाऊल जपून टाकायला पाहिजे. आरोग्याची समस्या निर्माण होईल. तुमच्या कुंडलीत अपघाताचे योग दिसून येतं आहेत. घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक संकट कोसळणार आहे.
वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे ग्रह गोचर पाहिलं तर सध्या शुक्र हा मंगळासोबत युती करणार आहे. त्यामुळे कुंडलीत तुमच्या वरच्या बाजूला म्हणजेच मेष घरात राहु असेल. तर सूर्य कर्क राशीत आहे. कुंडलीतील ग्रहांची स्थितीत पाहता या राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. काळात कुठल्याही शुभ कामांना सुरुवात करु नका. त्यासोबत या काळात बोलण्यावर संयम ठेवा.
मीन राशीच्या लोकांचा स्वामी हा गुरु आहे. गुरु सध्या मेष राशीत असून तिथे त्याची राहूसोबत युती झाली आहे. त्यामुळे अशुभ असा गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. त्यात यांच्यावर शनिची व्रकदृष्टी असणार आहे. त्यामुळे कुंडलीत एका बाजूला शनि आणि दुसऱ्या बाजूला राहु आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना या योगाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या काळात घरात वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे. ही वादावादी कोर्टातही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न करा घरात वाद होऊ देऊ नका. त्याशिवाय आर्थिक फटका बसणार आहे.