Numerology Horoscope 24 August 2022 : भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. हा एक असा प्रकार आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल माहिती मिळू शकते.
अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचे करिअर, विवाह योग, लव्ह लाईफ आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक माहिती मिळू शकते. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना अंकशास्त्रात सर्वात भाग्यवान मानले जाते. हे लोक कोणत्याही महिन्यातील 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक आहेत. या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो. हे लोक मुक्तपणे जीवन जगतात आणि त्यांना जे काही मिळवायचे आहे ते साध्य करतात. त्यांना खूप नशिबाची साथ मिळते आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळते.
केतूचा अंक मूलांक 7
पापी ग्रह मानल्या जाणाऱ्या केतू ग्रहाची संख्या ७ मानली जाते. या कारणामुळे मूलांक 7 च्या राशीच्या लोकांमध्ये केतू ग्रहाचा प्रभाव दिसतो. या राशीच्या लोकांना कधीच कुणासमोर झुकायला आवडत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला आणि जगायला आवडते. या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.
7 क्रमांकाच्या लोकांना खूप मान-सन्मान मिळतो
7 अंक असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो. या लोकांना पैशाची कमतरता नसते. ते खूप सक्रिय आहेत आणि त्यांचा वेळ वाया घालवायला आवडत नाहीत. या लोकांची कल्पनाशक्तीही चांगली असते. या लोकांना यश मिळवण्यासाठी आणि सहज यश मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही. या लोकांमध्ये एकच अडचण असते की ते कोणावरही सहज विश्वास ठेवतात. यामुळे ते अनेकवेळा फसवणुकीला बळी पडतात. हे लोक समाजसेवेत बराच वेळ आणि पैसा खर्च करतात आणि नेहमी इतरांना मदत करतात. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचीही खूप काळजी घेतात.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)