Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पुढील 9 दिवस दसऱ्यापर्यंत भक्तीभावाने दुर्गा मातीची आराधना आणि उपवास करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात घरात घटस्थापना करुन त्यावर अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. या काळात सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पण मासिक पाळी सुरू झाल्यावर महिलांसाठी ही चिंतेची बाब बनते. कारण हिंदू धर्मात मासिक पाळीदरम्यान धार्मिक विधी करता येत नाहीत. मग नवरात्रोत्सवात मासिक पाळी आल्यास पूजा कशी करावी, पठण कसे करावे, जेवण कसे बनवावे का, दिवा कसा लावावा हे महिलांना समजत नाही. तुमच्या या संभ्रमाचं निरासन ज्योतिषतज्ज्ञ आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी केलंय. (Navratri 2024 Should one fast during periods Worship Goddess Durga in this way astrology in marathi)
साधारणपणे महिलांची मासिक पाळी 22 ते 28 दिवसांच्या दरम्यान असते. अशा परिस्थितीत, मासिक पाळीबद्दल सर्वांना आधीच माहिती आहे. अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात मासिक पाळी येऊ शकते असे वाटत असेल तर उपवास करू नका. मात्र ज्या महिलांना उपवास करायचा आहे, त्यांनी पहिला आणि शेवटचा उपवास ठेवावा. या काळात दुर्गा मातेशिवाय पूजेचे साहित्य, कलश इत्यादींना हात लावू नका, तर दूरवरुन देवीचं दर्शन घ्या.
तसंच जर तुम्ही पहिले आणि शेवटचे व्रत करणार असाल तर दररोज दुर्गा सप्तशतीचं पठण करा आणि यासोबतच पूजा स्वतः करण्याऐवजी कुटुंबातील अन्य सदस्याकडून करून घ्या.
जर तुम्ही अचानक मासिक पाळी आली तर उपवास सुरु ठेवा आणि माता दुर्गाचे ध्यान करा. पण तुमच्या घरात घटस्थापना करण्यात आली असेल तर कुटुंबातील अन्य सदस्याकडून पूजा आणि दिव्यात तेल घाला. शिवाय अष्टमी किंवा नवमीचा दिवस असेल तर कन्यापूजा घरातील इतर सदस्यांकडून करुन घ्या. ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)