Mauni Amavasya 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. पौष महिन्यातील अमावस्येला विशेष महत्त्व असून त्याला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. अमावस्या तिथी तशी अशुभ मानली जाते मात्र मौनी अमावस्या शुभ असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते, असं म्हणतात. (Mauni Amavasya 2024 date shubh muhurat puja vidhi Panati of clay to swastika of turmeric women should do these works upay)
पंचांगानुसार पौष महिन्यातील पौष महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्या 9 फेब्रुवारीला असणार आहे. अमावस्या तिथी 9 फेब्रुवारी सकाळी 8:04 वाजेपासून 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 वाजेपर्यंत असणार आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूचे ध्यान करा. त्यानंतर पवित्र नदीत स्नान करून दान करा. नदी असल्यास आंघोळीच्या वेळी पाण्यात गंगाजल घालून आंघोळ करा. या दिवशी पवित्र नदी किंवा गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि दानधर्म करा.
अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये मौनी अमावस्या सर्वोत्तम मानली गेली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास फलदायी ठरते असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धेने पूजा करावी.
मौनी अमावस्येला घरातील महिलांनी काही उपाय नक्की करावेत.
गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करावा. त्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीनं स्वस्तिक काढावं. शास्त्रानुसार हळद हे घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यानंतर गॅसची पूजा करुन मातीची पणती लावावी.
या दिवशी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच दिवा लावावात.
घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद, सैंधव मीठ पाण्यात टाकून पुसल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो, अशी मान्यता आहे.
त्यासोबत घरातील मुख्यप्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला स्वच्छ करून हळदीचे लेपण करावे. लेपन शक्य नसेल तर हळदीने स्वस्तिक काढले. त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)