Mangal surya Yuti 2023 : मंगळ-सूर्याची युती बदलणार नशीब; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Mangal surya Yuti 2023 : येत्या काळामध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. मंगळ ग्रह आणि सूर्याच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. दरम्यान यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 2, 2023, 05:20 AM IST
Mangal surya Yuti 2023 : मंगळ-सूर्याची युती बदलणार नशीब; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा title=

Mangal surya Yuti 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक कालावधीनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. दर महिन्याला नऊ ग्रहांच्या स्थितीत बदल होत असतो. या काळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात, त्यामुळे राजयोग आणि युती तयार होते. त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो. 

दरम्यान येत्या काळामध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. मंगळ ग्रह आणि सूर्याच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. दरम्यान यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. यावेळी काही राशींना भरपूर पैसा मिळणार आहे, तर काहींचं कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक होणार आहे. जाणून घेऊया मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, ते पाहुयात.

वृश्चिक रास

सूर्य आणि मंगळाचा संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी फलदायी ठरू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून भरपूर फायदा होऊ शकतो.  या काळात तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होणार आहेत. 

सिंह रास

मंगळ आणि सूर्याचा संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. व्यवसायाशी निगडित लोकांना चांगला नफा मिळू शकतो. आकस्मिक पैसा मिळू शकतो. ज्यांचा व्यवसाय परदेशात आहे त्यांना फायदा होईल. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार केल्यास फायदा होईल. या कालावधीत तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो.

मकर रास

सूर्य आणि मंगळाचा संयोग अनुकूल ठरू शकतो. ही युती तुमच्या राशीनुसार नशिबाच्या स्थानावर होणार आहे. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता, जे शुभ सिद्ध होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल असेल आणि त्यांच्या अभ्यासासाठी फायदेशीर सिद्ध होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )