Festival Vrat List in September 2024: सप्टेंबर महिना हा धार्मिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण सप्टेंबरमध्ये सनातन धर्माचे अनेक प्रमुख सण येणार आहेत. गणेश चतुर्थी, हरतालिका आणि पितृ पक्ष या सणांमुळे हा महिना भाविकांसाठी खास ठरणार आहे. व्रतवैकल्यांनी संपन्न असणाऱ्या या पवित्र महिन्यात भाविक पूर्ण श्रद्धेने सगळे सणवार साजरे करतील. आणि आपल्या आराध्य देवी-देवतांची पूजनही करतील. तर सप्टेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या प्रमुख सणांच्या तारखा आणि महत्त्व जाणून घेऊया.
1 सप्टेंबर (रविवार) –
या दिवशी मासिक शिवरात्री आहे. हा भगवान शंकराच्या उपासनेचा दिवस आहे. पर्युषण या जैन धर्माचा मुख्य सणाच्या पर्वाचा आरंभ होत आहे.
2 सप्टेंबर (सोमवार) –
या दिवशी दर्श, सोमवती, पिठोरी अमावस्या आहे. या भाद्रपद अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दानाचे विशेष महत्त्व आहे. तसेच हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे.
6 सप्टेंबर (शुक्रवार) –
या दिवशी हरतालिका तृतीया आहे. हरतालिकेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते. तसेच या दिवशी वराह जयंतीही आहे. हा भगवान विष्णूच्या वराह अवताराचा दिवस आहे.
7 सप्टेंबर (शनिवार) –
गणेश चतुर्थी ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्रीगणेशाचा हा सण आहे. या दिवशी घरोघरी, चौका-चौकात गणपती बाप्पा विराजमान होतात.
8 सप्टेंबर (रविवार) –
या दिवशी ऋषी पंचमी आहे. महिलांसाठी विशेष महत्त्व असलेला हा सण आणि सात ऋषींच्या पूजेचा हा दिवस.
9 सप्टेंबर (सोमवार) –
स्कंद षष्ठी किंवा सूर्यषष्ठी भगवान कार्तिकेयच्या उपासनेचा हा सण. जो विशेषतः दक्षिण भारतात साजरा केला जातो.
10 सप्टेंबर (मंगळवार) –
ललिता सप्तमी हा शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ललिता देवीच्या उपासनेचा हा दिवस आहे. या दिवशी जेष्ठगौरी आवाहनही आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी जेष्ठगौरीचे आगमन होणार आहे.
11 सप्टेंबर (बुधवार) –
या दिवशी राधा अष्टमी: आहे. राधा राणीच्या जयंतीचा हा सण प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर या दिवशी जेष्ठगौरी पूजन आहे. यावेळी सवाष्णींना बोलावून त्यांचे आदरातिथ्य आणि पूजन केले जाते.
12 सप्टेंबर (गुरुवार) –
ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या या दिवशी ज्येष्ठा गौरीच्या मूर्तीचे आणि पाच दिवसाच्या, गौरी बरोबर जाणाऱ्या गणपतीचे विसर्जन करून आशीर्वाद घेतले जातात.
14 सप्टेंबर (शनिवार) –
या परिवर्तनिनी एकादशीला भगवान विष्णूच्या वामन अवताराच्या पूजेसाठी ही एकादशी केली जाते.
15 सप्टेंबर (रविवार) –
वामन जयंती हा भगवान विष्णूच्या वामन अवताराचा दिवस आहे. आणि ओणम हा दक्षिण भारतातील प्रमुख कापणीचा सण आहे. तसेच यादिवशी प्रदोष असल्याने शिव भक्तही उपासना करतील.
16 सप्टेंबर (सोमवार) –
या दिवशी विश्वकर्मा पूजा आहे. बांधकाम आणि हस्तकलेची देवता विश्वकर्मा यांच्या उपासनेचा दिवस आहे. त्याच बरोबर त्या दिवशी ईद-ए-मिलादही आहे.
17 सप्टेंबर (मंगळवार) –
अनंत चतुर्दशी भगवान अनंत (विष्णू) यांच्या उपासनेचा हा सण आणि गणेश उत्सवाचा समारोपाचा दिवस. या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येईल. प्रौष्ठपदी पौर्णिमाही यादिवशी आहे.
18 सप्टेंबर (बुधवार) –
या दिवशी पितृ पक्षाला सुरूवात होते आहे. म्हणजेच या दिवसापासून पितरांना समर्पित श्राद्ध पक्ष सुरू होतो. तसेच तेव्हा खग्रास चंद्रग्रहण आहे पण ते भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नये.
21 सप्टेंबर (शनिवार) –
विघ्नराज संकष्टी चतुर्थीला संकट दूर करण्यासाठी गणपतीची विशेष उपासना केली जाते.
24 सप्टेंबर (मंगळवार) –
कालाष्टमीच्या या दिवशी संकटांचा नाश करणाऱ्या भगवान कालभैरवाची पूजा केली जाते.
25 सप्टेंबर (बुधवार) –
मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी जीवितपुत्रिका हे विशेष व्रत: या दिवशी पाळले जाणार आहे.
27 सप्टेंबर (शुक्रवार) –
या दिवशी इंदिरा एकादशी आहे. पापांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत पाळले जाते.
30 सप्टेंबर (सोमवार) –
मासिक शिवरात्री आणि सोमप्रदोष असलेला या दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी खास दिवस आहे. तसेच या दिवशी येणारे त्रयोदशी श्राद्ध पितरांच्या शांतीसाठी केले जाते.