Mangal Gochar 2023 Dates : यावर्षी सातवेळा मंगळ गोचर होत आहे. त्यामुळे काही राशींना याचा लाभ होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी गोचर होत असतो. मंगळ गोचरमुळे (Mars Transit) दोन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून येणार आहे. 2023 हे वर्ष सुरु होताच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. पण हे सर्व केवळ विचार करून साध्य होत नाही. वास्तविक, ग्रह-नक्षत्रांतील बदल माणसाच्या जीवनातील सुख-दु:ख ठरवतात.
या वर्षी 2023 मध्ये मंगळ एकूण 7 वेळा आपली स्थिती बदलेल अर्थात तो गोचर होत आहे. इतर राशींसाठी हे फायदेशीर असेल, पण या राशींसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. मंगळ, ग्रहांचा सेनापती, जमीन, इमारत, योद्धा यांचा कारक मानला गेला आहे. मंगळ काही व्यक्तीना क्रोधी बनवतो जर मंगळ मकर आणि मीन राशीत असेल तर ते अधिक शुभ संकेत देतो. त्यामुळे या दोन राशींचा मंगळ या वर्षात जीवनात आनंद आणणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक या दोन राशी आहेत ज्यांचा स्वामी मंगळ आहे. आणि अशा स्थितीत मंगळ या राशीच्या लोकांना कधीही अशुभ परिणाम देणार नाही. कुंडलीत मंगळ शुभ असेल तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व कामे शुभ असतात. दुसरीकडे अशुभ मंगळामुळे व्यक्तीला डोळे दुखणे, सांधेदुखी, हाडे दुखणे, अशक्तपणा इत्यादी त्रास होतो. यावर्षी मंगळ कधी आणि किती वेळा गोचर होईल, ते जाणून घ्या.
जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत करायची असेल तर हातात लाल रंगाचा धागा घाला किंवा बांधा. तसेत आपल्याला आवड असेल तर कलावा देखील घालू शकता. याशिवाय मंगळाची वाईट प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन बुंदीचा नैवैद्य दाखवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)