Mangal Budh Grah Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती, त्यांचा स्वभाव गुणधर्म आणि कुंडलीतील स्थान यावरून अंदाज बांधला जातो. वैयक्तिक कुंडलीसह सर्वसमावेशक गोचर कुंडलीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. गोचर कुंडलीतील ग्रह अनुकूल असतील तर त्याचा जातकांना फायदा होतो. मात्र वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांची स्थितीही तितकीच महत्त्वाची असते. 48 तासानंतर दोन ग्रह राशी बदल करणार आहे. 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. तर ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रहाचा धनु राशीत उदय होणार आहे. ग्रहांच्या उलथापलथीमुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागणार आहे. मात्र काही राशींच्या या स्थितीचा फायदा होणार आहे.
हिंदू पंचांगानुसार 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ ग्रह रात्री 12 वाजून 7 मिनिटांनी वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. तर बुध ग्रहाचा सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी धनु राशीत उदय होणार आहे. या दोन ग्रहांची स्थितीमुळे मेष, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना फायदा होणार आहे.
मेष- मंगळ मार्गी आणि बुध ग्रहाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. या जातकांच्या जीवनावर ग्रहांच्या स्थितीचा सकारात्मक परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. आरोग्यविषयक तक्रारी देखील दूर होतील. तसेच इतर आर्थिक लाभ देखील या काळात मिळतील.
कर्क- दोन्ही ग्रहांची स्थिती या राशीच्या लोकांना फलदायी ठरेल. आर्थिक अडचणीतून सुटका होईल. तसेच कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पडेल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरी शोधात असलेल्यांना काही ऑफर मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असेल.
बातमी वाचा- Shani-Shukra Yuti: मकर राशीत दोन मित्र ग्रहांची होणार भेट, काय परिणाम होणार जाणून घ्या
सिंह- या राशीच्या लोकांनी अशा ग्रहमानामुळे दिलासा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून संकटाचा पाऊस सुरु असताना दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. कुटुंबीय आणि मित्रांची या काळात उत्तम साथ मिळेल. त्यामुळे अडचणीची कामं मार्गी लागतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)