भस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक्

Mahashivratri 2024 Bhashm Benefits: हिंदू धर्मात पवित्र भस्म हे कपाळावर लावणं अतिशय शुभ मानले जातं. भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. हे भस्म कपाळावर लावल्याने होणार फायदे जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Mar 7, 2024, 03:26 PM IST
भस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक् title=
Mahashivratri 2024 What is Bhasma Why is Bhasma dear to Mahadev You will be speechless to know the benefits in marathi

What is Bhasm: हिंदू धर्मात महाशिवरात्री ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठा सण मानला जातो. महाशिवरात्रीचा सण हा महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाहाचा सोहळा आहे. यादिवशी शिवलिंगावर भस्म, बेलपत्र आणि भांग अर्पण करण्यात येतं. महादेवाला बेलपत्र, भांगशिवाय भस्म हे अतिशय प्रिय आहे. त्रिशूळ, डमरू, रुद्राक्ष, गळ्यात नाग आणि कपाळावर भस्म अगदी अख्खा शरीराला भस्म लावून भगवान शिव अलंकारीत होतो. पण तुम्हाला भस्म म्हणजे काय, ते शंकराला एवढं प्रिय का आहे. त्याशिवाय ते कपाळावर लावल्यास आपण्यास काय फायदा होतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Mahashivratri 2024 What is Bhasma Why is Bhasma dear to Mahadev You will be speechless to know the benefits in marathi)

भस्म म्हणजे काय? 

भस्म ही अतिशय पवित्र राख मानली जाते. भस्म ही मंत्रजपासह एखाद्या धुनी, होम अथवा यज्ञातील विशिष्ट लाकूड, तूप, औषधी वनस्पती आणि काही पवित्र गोष्टीपासून तयार करण्यात येते. हिंदू संस्कृतीमध्ये हे पवित्र भस्म कपाळावर लावणे महत्वाचं मानलं गेलं आहे. भारतात भस्म अंगाला लावणे हे सामान्यपणे पाहिला मिळतं. 

महादेवाला का प्रिय आहे भस्म? 

महादेवाला भस्म प्रिय का आहे याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. शिवपुराणात असं सांगितलं आहे की, जेव्हा सतीने रागाच्या भरात स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन केलं होतं, त्या वेळी महादेव तिच्या मृतदेहासह पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र भ्रमण करत होते. महादेवाचं हे रुप पाहून भगवान विष्णू अस्वस्थ झाले त्यांनी माता सतीच्या पार्थिवाला स्पर्श करुन त्याचं राखेत रुपांतर केलंय. त्यानंतर महादेवाच्या हातात फक्त राख उरली. त्यानंतर महादेवाने सतीच्या स्मरणार्थ ही राख अंगावर लावून घेतली. 

धर्मग्रंथांमध्ये तर असं सांगण्यात आलं की, भगवान शिव कैलास पर्वतावर वास करायचे तिथे खूप थंडी असायची. या थंडीपासून संरक्षण मिळावं म्हणून महादेव अंगाला राख लावायचे. तर एका पौराणिक कथेनुसार, एक साधू होता जो खूप तपश्चर्या करून शक्तिशाली झाला होता. तो फक्त फळं आणि हिरवी पानं खात होता. म्हणून त्याचं नाव ‘प्राणद’ असं होतं. त्या साधूने आपल्या तपश्चर्येने जंगलातील सर्व प्राण्यांवर ताबा घेतला होता असं म्हटलं जायचं. एकदा साधू आपली झोपडी दुरुस्त करण्यासाठी लाकूड कापत असताना त्याचे बोट कापले आणि त्यातून रक्ताऐवजी रस निघत होता. 

हे पाहून साधूचा समज झाला की आपलं शरीर इतकं शुद्ध झालं आहे की, आपल्या शरीरात रस भरला आहे. त्यामुळे त्याला आनंदासोबत अभिमान वाटला. या घटनेनंतर साधू स्वत:ला जगातील सर्वात धार्मिक व्यक्ती मानायला लागला. हे पाहून भगवान शंकरांनी वृद्धाचं रूप धारण केलंय. म्हातार्‍याच्या वेशात भगवान शिवाने ऋषींना विचारलं, 'तो इतका आनंदी का आहे?’ त्यावर साधूने तिला सर्व सांगितलं. हे ऐकून महादेव म्हणाले की, हा फक्त वनस्पती आणि फळांचा रस आहे. मात्र जेव्हा झाडे आणि वनस्पती जळून जातात तेव्हा ते देखील राख होतात आणि शेवटी उरते फक्त राख. 

भगवान शिवाने वृद्धाचे रूप धारण केलं आणि आपलं बोट कापलं. तर त्यातून रक्ताऐवजी राख निघाली. हे पाहून साधूने आपल्या अज्ञानाबद्दल क्षमा मागितली. या घटनेनंतर भगवान शिवांनी आपल्या भक्तांना हे नेहमी लक्षात राहावं म्हणून  शरीरावर भस्म लावतात. 

भस्म अंगाला लावण्याचे काय फायदे आहेत?

1) चायनिज अॅक्युप्रेशर शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील दोन भुवयांच्या मधील भाग हा शरीरातील सर्व नसांना जोडणारा बिंदू मानला जातो. या भागावर मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते, असं म्हणतात. असं म्हणतात की, या बिंदूवर भस्म किंवा विभूती लावल्याने डोकेदुखी कमी होते असं म्हणतात. 

2) आपल्या प्रत्येकाच्या कपाळावर तिसरा डोळा असतो. जो अंर्तमनाचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे भस्म किंवा विभूती लावल्यास या चक्रामधून नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे. 

3) भस्म अथवा राखेचा आयुर्वेदिक औषध म्हणून देखील उपयोग केला जातो. भस्म अथवा विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेतल्यामुळे सर्दीचा त्रास होत नाही. 

4) शरीराला भस्म लावल्यास शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे दूर होऊन नैसर्गिक उर्जा आपल्याला मिळते. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)