Mahashivratri 2024 : केवळ दूध नाही तर राशीतील ग्रहस्थितीशी संबंधित समस्यांनुसार शिवलिंगावर करा 'या' वस्तूंचा अभिषेक

Mahashivratri 2024 Astrology Tips : मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात असते. पण माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला वर्षातील सर्वात शक्तीशाली अशी महाशिवरात्री असते. यादिवशी शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. राशीतील ग्रहस्थितीशी संबंधित समस्यांनुसार शिवलिंगावर विशेष वस्तूंनी केलेला अभिषेक अधिक फलदायी ठरतो. 

नेहा चौधरी | Updated: Mar 7, 2024, 02:48 PM IST
Mahashivratri 2024 : केवळ दूध नाही तर राशीतील ग्रहस्थितीशी संबंधित समस्यांनुसार शिवलिंगावर करा 'या' वस्तूंचा अभिषेक title=
Mahashivratri 2024 Not only milk but also Offerings these items on Shivlinga according to planetary position issues Mahashivratri 2024 Upay Astrology Tips in marathi

Mahashivratri 2024 Astrology Tips in Marathi : प्रकृतीचा कारक, देवांचा महादेव शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा हा माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला महाशिवरात्री असं म्हणतात. असं म्हणतात यादिवशी महादेव पृथ्वीतलावर येतात आणि आपल्याला ऊर्जा देतात. महाशिवरात्रीला आपल्या परिसरातील शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक शिवभक्त करतात. आपण शिवलिंगावर अभिषेक करताना कधी दूध, कधी मध तर कधी जल अर्पण करतो. (Mahashivratri 2024 Not only milk but also Offerings these items on Shivlinga according to planetary position issues Mahashivratri 2024 Upay Astrology Tips in marathi) 

ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी महाशिवरात्र आणि शिवलिंगावर अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तूंचं ग्रहांशी कसा संबंध आहे, याबद्दल सांगितलं आहे. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमजोर असेल तर आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. म्हणून अशा वेळी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करुन तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला उपाय (Mahashivratri 2024 Upay) सांगितले आहेत.

हेसुद्धा वाचा - Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात...

शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा आणि समस्या दूर करा!

महाशिवरात्रीला आम्ही शिवलिंगाला वेगवेगळे साहित्य अर्पण करुन तुम्ही समस्याचं निरसन करु शकता. 
प्रसिद्धीसाठी - शिवलिंगावर गूळ आणि दूध याचा अभिषेक करा. 
भावनिक संतुलन आणि रोख रकमेसाठी - शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा. 
संवाद मजबूत करण्यासाठी - शिवलिंगावर बेलपत्र आणि इलायची अर्पण करा.
 आनंद आणि नशीब बळकट करण्यासाठी - शिवलिंगावर केळी अर्पण करा. 

सुखी वैवाहिक जीवनासाठी - शिवलिंगावर तूपाने अभिषेक करा
 इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी - शिवलिंगावर मधाने अभिषेक करा.
 ध्येय साध्य करण्यासाठी - शिवलिंगवर बार्ली अभिषेक करा. 
योग्य दिशा आणि निर्णयासाठी - शिवलिंगावर काळा आणि पांढरा तिळाने अभिषेक करा
कार्याला गती देण्यासाठी - शिवलिंगावर काळी मिरी आणि लवंगने अभिषेक करा.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)