Ganesh Jayanti 2025: 1 की 2 फेब्रुवारी? माघी गणेशोत्सव कधी? चुकूनही 'या' वेळेत चंद्रदर्शन करू नका!

Maghi Ganesh Jayanti 2025 : यंदा माघी गणेश जयंतीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवशी गणेश जयंती साजरी करणं शुभ असेल जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर.   

नेहा चौधरी | Updated: Jan 30, 2025, 04:57 PM IST
Ganesh Jayanti 2025: 1 की 2 फेब्रुवारी? माघी गणेशोत्सव कधी? चुकूनही 'या' वेळेत चंद्रदर्शन करू नका! title=

Maghi Ganesh Chaturthi 2025 Date In Marathi : भारतात गणेश हा लोकप्रिय देवता असून त्याचा पूजेशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत गणेशा हा आपला आपल्यासा वाटतो. भारतात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला असणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात माघ महिन्यातही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. हो, वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करण्यात येते. याला विनायक चतुर्थी तसंच वरद चतुर्थी असेही म्हटलं जातं. यंदा माघी गणेशोत्सव तारखेबद्दल संभ्रम आहे. माघी गणेश जयंती ही 1 की 2 फेब्रुवारी नेमकी कधी आहे? 

माघी गणेश जयंती 2025 नेमकी कधी आहे?

वैदिक पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 02 फेब्रुवारी 2025 रात्री 09:14 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 1 फेब्रुवारीला माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

गणेश जयंती 2025 चा शुभ मुहूर्त!

गणेश पूजा मुहूर्त - सकाळी 11:38 ते दुपारी 13:34 वाजेपर्यंत असून पूजाचा एकूण कालावधी  01 तास 57 मिनिटं असणार आहे. 

निषिद्ध चंद्र दर्शन वेळ, या वेळेत चुकूनही चंद्राकडे पाहू नये..

गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहणे अशुभ मानले जाते. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्याने चोरीचा आळ येतो असा समज आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी 08:52 ते 21:01 पर्यंत चंद्र पाहू नये. निषिद्ध कालावधी - 12 तास 08 मिनिटं आहे. 

गणेश जयंती 2025 दिनी शुभ योग

वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परीघ योगासह शिव आणि रवि योग तयार होत आहेत. या दिवशी परिघ योग दुपारी 12.24 पर्यंत राहील. यानंतर शिवयोग सुरू होईल. यासोबतच सकाळी 7.09 वाजल्यापासून रवियोग तयार होत असून, जो 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे 2.33 पर्यंत राहील.

गणेश जयंती 2025 रोजी भद्राचं सावट?

गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली रात्री 10.26 वाजता दिसेल, जी 2 फेब्रुवारीला सकाळी 7.09 पर्यंत राहणार आहे. हिंदू धर्मात भद्र काळात शुभ काम केले जात नाहीत. 

गणेश जयंती 2025 चे महत्व

पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने शेणाच्या पोळीपासून गणेशाची निर्मिती तयार केली होती. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. श्रीगणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. यामुळे जीवनात शुभ परिणाम येतात आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे. 

माघी गणेश जयंतीला काय करावे?

या दिवशी गणपती बाप्पाना नैवेद्यामध्ये तीळाचा पदार्थ द्यावा. जर तुम्ही बाप्पाचा आवडीचा मोदक करणार असाल तर तीळ आणि गूळाचा तयार करावा.  या दिवशी गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. गणेश जयंतीला व्रत करुन घरात सुख, शांती, समृद्धी वाढते मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना केली जाते. 

अशी करा पूजा !

मातीची किंवा घरातील तांबी, पितळ, चांदीची मूर्तीच पूजा करावी. त्यानंतर 16 षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करुन अथर्वशीर्षाचं पठण करावं. यादिवशी आठवणीने बाप्पाला 21 दुर्वा नक्की अर्पण करा. मातृदेवता ही 21 असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला 21 दुर्वा वाहवेत. 

गणेश जयंतीला गणेशाच्या या मंत्रांचा जप करा

-ॐ गं गणपतये नमः
-ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा
-ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
-ॐ गं क्षिप्रप्रसादनाय नमः
-ॐ गणेश ऋणं छिन्धि वरेण्यं हुं नमः फट
-गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्
-श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा
-गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः
-विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धितायं
-अमेयाय च हेरंब परशुधारकाय ते। मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x