Magh Purnima 2024 : वर्षात 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा येत असतात. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. पौर्णिमा तिथी अतिगंड आणि सुकर्मा योग आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूची उपासना करण्याचा योग जुळून आला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथीसोबत रविवदास जयंती आणि ललिता जयंतीदेखील आहे. माघ पौर्णिमेला देव स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे यादिवशी पवित्र नदीत स्नान करुन दान केल्यास पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रात सांगण्यात आलंय. (Magh Purnima Date Religious Significance and Puja Rituals importance know the magh purnima 2024 shubh muhura in marathi)
पंचांगानुसार माघ पौर्णिमा तिथी ही 23 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 3:36 वाजेपासून 24 फेब्रुवारी 2024 ला संध्याकाळी 6:03 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे.
माघ पौर्णिमा तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 05.11 ते 06.02 पर्यंत आहे. तसंच दुपारी 12:12 ते 12:57 पर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे.
पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते. माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसाठी सकाळी 08:18 ते सकाळी 9:43 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 06:12 वाजेपर्यंत असून लक्ष्मी पूजनाची वेळ सकाळी 12:09 ते दुपारी 12:59 वाजेपर्यंत असणार आहे.
माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करा. त्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. यादिवशी हवन, व्रत आणि जप करण्यात येतो. भगवान विष्णूची पूजेसोबत पितरांची पूजा या दिवशी केली जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर सूर्य मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करण्यात येते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी विशेषतः पांढरे आणि काळे तीळ दान केले जाते. असं म्हणतात की, माघ महिन्यात काळ्या तीळाने हवन आणि पितरांना काळे तीळ अर्पण केल्यास त्यांच्या आत्मांना शांती मिळते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे शुभ मानले जाते. माघी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री हरी विष्णू गंगेच्या पाण्यात वास असतो असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष फळ प्राप्त होते. याशिवाय माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाती. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्र दोष दूर असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी घरात समृद्धी नांदावी म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)