Magh Purnima 2024 : माघी पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, स्नान-दान वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Magh Purnima 2024 : माघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी यादिवसाला शुभ मुहूर्तावर पूजा करणं शुभ मानले जाते. 

नेहा चौधरी | Updated: Feb 23, 2024, 12:40 PM IST
Magh Purnima 2024 : माघी पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, स्नान-दान वेळ आणि महत्त्व जाणून घ्या title=
Magh Purnima 2024 time shubh muhurat snan daan samay and importance in marathi

Magh Purnima 2024 :  हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. त्यात माघ महिन्यातील पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे. शिवाय पवित्र नदीत स्नान करुन दान केल्यास बत्तीसपट पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तसंच सुख, शांती आणि समृद्धीसाठी माघ पौर्णिमेला भगवान सत्यनारायाण, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि चंद्रदेवाची पूजा करण्यात येते. (Magh Purnima 2024 time shubh muhurat snan daan samay and importance in marathi)

माघ पौर्णिमा तिथी 2023 

पंचांगानुसार, माघ पौर्णिमा शुक्रवारी 23 फेब्रुवारीला दुपारी 03:33 वाजेपासून दुसऱ्या दिवशी शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 ला संध्याकाळी 05:59 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. 

माघ पौर्णिमा गंगा स्नान महत्त्व!

पौराणिक ग्रंथानुसार माघ महिन्यात सर्व देव स्वर्गातून पृथ्वीवरील प्रयागराज, त्रिवेणीमध्ये अवतरतात, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लोक प्रयागराजमधील गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणीमध्ये स्नान, ध्यान, जप, ध्यान करुन मोक्ष प्राप्त करतात. 

माघ पौर्णिमा 2024 चा शुभ मुहूर्त

स्नान आणि दानासाठी शुभ वेळ -  24 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 05.11 ते 06.02 वाजेपर्यंत 

माघ पौर्णिमा योग

रवि योग - 24 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 06.53 ते 07.25 वाजेपर्यंत 

माघ पौर्णिमेच्या दिवशी रवियोगासोबत आयुष्मान योग, शोभन योग, सौभाग्य योग, रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. 

माघी पौर्णिमा स्नान आणि विधी

माघ पौर्णिमेच्या सूर्योदयापूर्वी गंगा स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन घरातील मंदिरातील देवांची पूजा करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळे किंवा लाल फुले, पिवळे चंदन, रोळी आणि अक्षत अर्पण करावी. यानंतर विष्णु सहस्रनामाचे पठण करा. त्यानंतर श्री हरी आणि देवी लक्ष्मीची आरती करा. त्यानंतर दानधर्म करा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करा. असं म्हणतात की, या दिवशी श्री हरी आणि लक्ष्मीजींची पूजा केल्याने सर्व आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळते. 

माघी पौर्णिमेला 'या' मंत्राचा जप करा!

ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः ।

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.