Chandra Grahan 2022 : इथे दिवाळीवर (Diwali 2022) सूर्यग्रहण असतानाच आता देव दिवाळीवरही ग्रहणाचं सावट असणार आहे. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. 8 नोव्हेंबरला देव दिवाळीच्या (Dev Dipawali) दिवशी हे ग्रहण असून, ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत.
चंद्रग्रहणाची वेळ आणि तारीख... (Chandra Grahan date and time, Sutak kaal)
चंद्रग्रहण तिथी- 8 नोव्हेंबर 2022
ग्रहणाची सुरुवात- सायंकाळी 5 वाजून 32 मिनिटं
ग्रहण समाप्ती- सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटं
सूतक काळ प्रारंभ- सकाळी 9 वाजून 21 मिनिटं
सूतक काळ समाप्ती- सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटं
भारतात कुठे दिसणार ग्रहण?
8 ऑक्टोबरला असणारं हे ग्रहण (Kolkata) कोलकाता, सिलीगुडी, पटना, रांची, गुवाहाटी या ठिकाणांवरून दिसेल.
जगभरातून हे ग्रहण उत्तर- पूर्व युरोप, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफीक महासागर प्रदेश, अरबी समुद्र, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या भागांतून दिसेल.
हिंदू मान्यतांनुसार ग्रहणाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी...
हिंदू मान्यांनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणापूर्वी 9 तास आधी सुरू होणार आहे.
अनेकांच्या मते ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी सावध राहावं.
चंद्रग्रहणाचा सूतक काळ, अशुभ मानलं जातं. यावेळी हा काळ 9 तास आधी सुरु होऊन ग्रहणानंतर संपणार आहे.
सूतक काळ सुरु झाल्यानंतर पूजापाठ किंवा इतरही धार्मिक कार्य करु नयेत.
चंद्रग्रहणानुसार प्रवासही करणं टाळावं. प्रवासाची संधी आल्यास ते टाळावं.
चंद्रग्रहणात कोणतंही शुभकार्य करु नका.
चंद्रग्रहणामध्ये झोपू नका, धारदार वस्तूंचा वापरही करु नका.
चंद्रग्रहणामध्ये दान आणि स्नान या घटकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळं शक्य त्या समयी त्याचं पालन करा.
(वरील माहिती सामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)