Law Of Attraction: तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर बदला, भाग्य उजळेल... कसं शक्य आहे? वाचा

अनेकांना याबाबत साशंकता वाटू शकते मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे हे शक्य होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात

Updated: Sep 18, 2022, 02:46 PM IST
Law Of Attraction: तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर बदला, भाग्य उजळेल... कसं शक्य आहे? वाचा title=

Positive thinking attracts positive vibes: चांगल्या गोष्टी पाहिल्याने चांगले परिणाम मिळतात तर वाईट गोष्टी पाहिल्याने वाईट परिणाम मिळतात असं सर्वसाधारणपणे बोललं जातं. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ऐकलं असेल किंवा वाचलंही असेल. आपण पॉझिटिव्ह विचार केला की आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. आपण खूप निगेटिव्ह विचार केला की आपल्यासोबत काही दुर्दैवी घटना घडतात. आपण एखादी गोष्ट वारंवार पाहतो, वाचतो किंवा विचार करतो त्या गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होते. म्हणून आपल्याला लहानपणापासून चांगल्या गोष्टी पाहाव्यात, त्यांचं आचरण करावं असं सांगितलं जातं.

आज या बातमीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवू शकतात, यासाठी तुम्हाला कोणती एक लहानशी गोष्ट करायची आहे, याबाबत सांगणार आहोत. आपल्या सर्वांकडे मोठ्या स्क्रीनचा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोनचा तुम्हाला स्वतःला सकारात्मक ठेवायला, सकारात्मकता तुमच्याकडे खेचून आणण्यास मदत करू शकतो.

जाणून घेऊयात कसं?

आपल्याला मोबाईलवर मेसेजेस येतात, फोन येतात, आपण मोबाईलवरून ई-मेल करतो, गेम्स खेळतो, व्हिडीओ पाहतो असे एक ना अनेक कामं करतो. अशात आपल्याला सर्वात आधी मोबाईलवरील एक गोष्ट पाहावी लागते ती म्हणजे मोबाईलचा वॉलपेपर. लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे तुम्ही तुमचा पॉझिटिव्ह वॉलपेपर कायम पाहात राहिलात तर तुम्हाला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. आपण दिवसातून अनेकदा आपल्या मोबाईलचा वॉलपेपर पाहत असतो. त्यामुळे आपण या मोबाईलच्या वॉलपेपरचा आपल्याला हवा तसा वापर करू शकतो. 

गरजेनुसार सेट करा वॉलपेपर: 

तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर सेट करू शकतात. तुमच्याकडे पैसे टिकत नाही, तुम्हाला जॉब मिळत नाही, तुमच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतायत, तुम्हाला मनशांती मिळत नाही, अशावेळेस तुम्ही मोबाईलवर संबंधित विषयांबाबतचे वॉलपेपर सेट करू शकतात.

मदत करणारे हात - Helping Hand - 

तुमची एखाद्या मोठ्या अडचणीत सापडला असाल तर तुम्ही मोबाईलवर मदत करणाऱ्या हातांचे फोटो वापरू शकतात.

राणीफुलाचा फोटो - Peony Flower - 

एखाद्या व्यक्तीचं लग्न होत नसेल, लग्नाला उशीर होत असेल तर अशा व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर पियोनी फ्लावर म्हणजेच राणी फुलाचं चित्र वॉलपेपर म्हणून सेट करावं. वास्तुशात्रामध्येही याला प्रचंड महत्त्व आहे.

नृत्य करणारं दाम्पत्य - Dancing Couple -

वैवाहिक जीवनात प्रचंड तणाव असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर नृत्य करणाऱ्या दाम्पत्याचा फोटो वापरू शकतात
 
ब्लेसिंग बुद्धा - Blessing Buddha -

तुमच्या घरात सातत्याने भांडणं होत असतील तर तुम्ही मोबाईलवर ब्लेसिंग बुद्धाचा फोटो वापरू शकातात

हिरवळ किंवा घनदाट हिरवं जंगल - Green Jungle - 

जॉब मिळत नसे तर अशा माणसांनी आपल्या मोबाईलवर हिरवळ दाखवणारा वॉलपेपर सेट करावा 

अशोक स्तंभ - Ashok Stambha - 

ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे अशांनी आपल्या मोबाईलवर अशोक स्तंभाचं  चित्र ठेवावं 

फिनिक्स पक्षी - Phoenix Bird

तुम्ही जे काम करत आहेत त्यात तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फिनिक्स पक्ष्याचा फोटो वापरू शकतात

धावणारे घोडे - Running Horse -

ज्यांना आपल्या व्यवसायात भरभराट हवी असेल अशा व्यक्तींनी मोबाईलवर धावणाऱ्या लाल घोड्यांचा फोटो लावावा. फोटोतील घोड्यांची संख्या विषम असावी

अनेकांना याबाबत साशंकता वाटू शकते मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे हे शक्य होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात

विशेष नोंद - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

law of attraction, positive vibes, mobile wallpaper and chang in fortune, marathi news, positive thinking, zee 24 taas

law of attraction how changing mobile wallpaper will change your fortune important tips