Kojagiri Purnima 2022: आज कोजागिरी पौर्णिमा (Kojagari Puja 2022)...म्हणजे आज घरोघरी मसाला दूध बनवलं जाणार. मसाला दुधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शरद पौर्णिमा (Sharad Purnima 2022) म्हणजे कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्यात येते.कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्री पूजा केल्याने देवी लक्ष्मीची प्रसन्न होते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. (kojagiri purnima 2022 puja muhurat VIDEO nmp)
आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी
9 ऑक्टोबरला पहाटे 03:41 पासून सुरू
10 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त
देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑक्टोबरला रात्री 11.50 ते 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 12.30 वाजेपर्यंत असेल.
पौराणिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीजा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री जागरण करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे केल्यास आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. असं म्हटलं जातं की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो, त्यामुळे या रात्री गच्चीवर चंद्रप्रकाशात मसाला दुधाचं सेवन केलं जातं.
अनेक जणांना कोजागिरी पौर्णिमेला पूजा कशी करायची आणि त्यांची मांडणी कशी असते याबद्दल माहिती नसतं. अशावेळी आज आम्ही तुम्हाला व्हिडीओद्वारे तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ते सांगणार आहोत.