मेष - बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला असू शकतो. करियरमध्ये पुढे जाण्याच्या संधी आहेत. आत्मविश्वासामुळे कठिण कामंही पूर्णत्वास नेऊ शकता. पैशांच्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ - काम अधिक असू शकते. काही लोक तुमच्याकडून स्वत:ची कामं पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करु शकतात. सावध राहा. कामात मन नसल्याने कामात अडथळे येऊ शकतात. अधिक विचार करु नका. जोडीदाराशी मनातील गोष्टी लपवू नका. शारीरिक कुरबुरी जाणवू शकतात.

मिथुन - नोकरी, व्यवसायात कुटुंबाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला. प्रगतीचे मार्ग मिळतील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. घरात उपयोगाची वस्तू खरेदी करु शकता. सकारात्मक राहा. विश्वासू व्यक्तीची मदत मिळू शकते. तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल.

कर्क - नवीन व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. जुन्या योजनांवर काम सुरु करु शकता. तब्येतीत सुधारणा होईल. काही नवीन करण्याची इच्छा होऊ शकते.

सिंह - तुमचे प्रयत्न सफल होऊ शकतात. व्यवसायात नवीन योजना आखू शकता. जोडीदाराची साथ मिळेल. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

कन्या - भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. वादाचे प्रसंग येऊ शकतात. मानसिक समस्या जाणवू शकतात. जवळच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 

तुळ - कामाकडे पूर्ण लक्ष द्या. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. आज आखलेल्या योजना फायदेशीर ठरु शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. नवीन, सकारात्मक गोष्टींमुळे जीवनात चांगले बदल घडू शकतात. 

वृश्चिक - व्यवसाय चांगला राहील. खास काम पूर्ण होऊ शकते. तब्येत ठीक राहील. गुंतवणूकीसाठी योजना आखू शकता. अचानक होणारी भेट फायद्याची ठरु शकते. 

धनु - नोकरीत बढतीची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. घर, ऑफिस दोन्हीकडे वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. कामासंबंधी अडचणी कमी होऊ शकतात. थकवा जाणवू शकतो.

मकर - आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नवीन ओळखींचा फायदा होऊ शकतो. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वैवाहिक  जीवन सुखी राहील. अधिक जेवणाने त्रास होऊ शकतो. तब्येतीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.

कुंभ - काम वाढण्याची शक्यता आहे. सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल. बरोजगार लोकांना नोकरीची संधी मिळू शकते. विचाराधीन असलेली कामं पूर्ण होतील. वातावरण बदलाचा त्रास होऊ शकतो.

मीन - वाणीवर संयम ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे आळस, थकवा जाणवू शकतो. उत्पन्नानुसार खर्च करा. विचार करुनच गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. 

  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
know your 5-october-2019-todays-horoscope-astrology
News Source: 
Home Title: 

आजचे राशीभविष्य | शनिवार | ५ ऑक्टोबर २०१९

आजचे राशीभविष्य | शनिवार | ५ ऑक्टोबर २०१९
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
आजचे राशीभविष्य | शनिवार | ५ ऑक्टोबर २०१९
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, October 5, 2019 - 08:16