Ketu Gochar in 2023 Tips To Side Effects And Preventive Measures: केतू हा अतिशय रागात असणारा ग्रह मानला जातो. एकदा केतू व्यक्तीच्या कुंडलीत बसला की तो कधीच काही चांगलं करू शकत नाही, असे म्हटले जाते. येत्या 2023 या वर्षचा मूलांक हा 7 होत आहे. अंकशास्त्रात केतू हा नंबर 7 चा स्वामी मानला जातो. म्हणजेच येत्या नवीन वर्षात केतूचा प्रचंड प्रभाव असणार आहे. केतूच्या या प्रभावामुळे अनेक लोकांच्या जीवनात अशुभ घटना बघायला मिळतील आणि त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होणार आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःला या अशुभ प्रभावांपासून मुक्त ठेवू शकता. (Astrology)
केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी कुत्र्याला दोन रंगांची भाकरी खायला द्या. शक्य असल्यास कुत्रा पाळावा, असे केल्यानं वर्षभर केतूला शांतता मिळेल. आठवड्यातून एक किंवा दोनदा गायीला हिरवा चारा खायला द्यायला विसरू नका. असे केल्यानं तुम्हाला जीवनात प्रगती आणि घरामध्ये शांती मिळेल. (New Year 2023)
हेही वाचा : Venus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी
वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन नवीन ध्वज फडकवा. तपकिरी रंगाचे कपडे परिधान करून काळ्या तिळाचे दान करा. अश्वगंधाचे रोप लावा आणि इतरांशी चांगल्या प्रकारे वागा. हे उपाय केल्यानं तुमच्या राशीत असलेल्या ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून सुटका होईल आणि तुमचे भाग्य उंचावेल. (Donate This Things To Get Rid Of Ketu Gochar in 2023)
हे वर्ष शुभ आणि मंगलमय होण्यासाठी केतूशी संबंधित अनेक गोष्टींचे दान करा. त्यात तीळ, लिंबू, चाकू, आमचूर, करवंदाचे लोणचे आणि सप्धान्य शस्त्र यांचा समावेश आहे. घरातील वडीलधाऱ्यांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घ्या. या उपायांनी केतूचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि तुमचे जीवन मंगलमय असेल. (Astrology About New Year 2023)
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)