कुंडलीत काल सर्प दोष कधी बनतो? अत्यंत हानिकारक योगामुळे आयुष्य होतं संघर्षमय

Kaal Sarp Dosh : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष असतो त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. 

Updated: Aug 8, 2023, 06:40 PM IST
कुंडलीत काल सर्प दोष कधी बनतो? अत्यंत हानिकारक योगामुळे आयुष्य होतं संघर्षमय  title=
kaal sarp dosh symptoms kaal sarp yog in kundli sarp dosh upay astro remedies shravan adhik maas 2023

Kaal Sarp Dosh Puja Benefits : वैदिक ज्योतिषशास्त्रात काल सर्प दोष अत्यंत अशुभ समजला जातो.  ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावेल लागते. कुंडलीतील काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला समोरे जावं लागते. त्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिष पंडीत कालसर्प दोषाची विधीवत पूजा करायला सांगतात जी अत्यंत महत्त्वाची असते. पण आपल्या कुंडलीत हा योग कसा तयार होतो. शिवाय याची लक्षणं काय आणि उपाय काय असतात ते समजून घेऊया.  (kaal sarp dosh symptoms kaal sarp yog in kundli sarp dosh upay astro remedies shravan adhik maas 2023  )

कुंडलीत काल सर्प दोष कधी तयार होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष तयार होत असतो.  

कालसर्प दोषाची लक्षणं

1) ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्या लोकांना स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर कुणीतरी त्यांचा गळा दाबत आहे, असा भास होतो. 

2)  या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष सहन करावा लागतो. शिवाय गरजेच्या वेळीदेखील तो व्यक्ती एकटाच असतो. 

3) कालसर्पग्रस्त असलेल्या व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्याला त्यात नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्या लोकांना कष्ट करुनही तोटा सहन करावा लागतो. 

4)  झोपेत अंगावर साप रेंगाळताना किंवा साप चावताना असं भासणे. 

5) जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वादावादी आणि भांडण होणे. 

6)  काल सर्प दोषाने पीडित व्यक्तीला स्वप्नात वारंवार भांडणं दिसणे.

7) काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच डोकेदुखी, त्वचारोग इत्यादीही कालसर्प दोषाची लक्षणं असतात.

8) जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल तर हे देखील काल सर्प दोषाचं एक लक्षण असल्याचं ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात. 

काल सर्प दोषाचे उपाय

कालसर्प दोषामुळे माणसाचं आयुष्य खूप संघर्षमय असतं.  यातून मार्ग काढण्यासाठी काल सर्प दोषाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. काल सर्प दोषाचा प्रभाव कमी खालील उपाय करा. 

1) काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक कराला पाहिजे. 

2) प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक केल्यास कालसर्प दोषाच्या प्रभाव कमी होतो.

3)  त्या व्यक्तीने दररोज कुलदैवताची पूजा करणे गरजेचं आहे. 

4) महामृत्युंजय मंत्राचा जप 108 वेळा नियमित करावा. 

5) दररोज 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा. 

6) घरात मोराची पिसे ठेवल्यास कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. 

 

हेसुद्धा वाचा - Mangal Dosh म्हणजे काय? लग्नाशी कसा संबंध, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या

 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)