Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे. ग्रहांच्या गोचर स्थितीमुळे यावेळी 200 वर्षानंतर अशुभ योग तयार होत आहे. या दिवशी मंगळ, शनि, सूर्य आणि राहु एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्याचबरोबर तूळ राशीत सूर्य, बुध ,केतू आणि शुक्राची युती होत आहे. या व्यतिरिक्त शनि कुंभ राशीतल्या पंचम आणि मंगळ मिथुन राशीच्या नवम स्थानात विनाशकारी योग तयार करत आहे.
शनि-मंगळ एकमेकांसमोर असल्याने षडाष्टक योग, नीचराज भंग आणि प्रीति योग तयार करत आहे. त्यात मंगळ आणि गुरु वक्री अवस्थेत असणार आहेत. त्यामुळे या काळात काही लोकांना सांभाळून राहणं गरजेचं आहे. ग्रहणाचा पाच राशींवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात आरोग्य, आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
Kartik Pournima: कार्तिक पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, आर्थिक अडचण होईल दूर!
भारतातील पूर्वोत्तर भागातून हे ग्रहण दिसणार आहे. तर इतर भागातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, रांची, गुवाहाटी येथून चंद्रग्रहण दिसणार आहे. जगभरात हे ग्रहण ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतून दिसणार आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)