मुंबई : चाणक्य नितीमध्ये अर्थशास्त्र, कुटनीती, राजकारण याशिवाय समाजजीवनाशी संबंधित व्यावहारिक गोष्टींबद्दल शिकवण देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीने जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं इत्याही गोष्टी चाणाक्य नितीमध्ये सांगण्यात आल्यात आहे. स्त्रीयांनी पुरुषांसोबत आणि पुरुषांनी स्त्रीयांसोबत कशी वागणुक करायला हवी, एवढंच नाही तर महिला रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी करतात, त्या पुरुषांनी चुकूनही पाहायच्या नाही, अशा अनेक गोष्टींबद्दल चाणाक्य नितीमध्ये सांगितल्या आहेत.
- चाणाक्य नितींमध्ये सांगितल्यानुसार महिला जेव्हा भोजन करत असतील तेव्हा पुरुषांनी त्यांच्याकडे पाहू नये. ही गोष्ट शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. असे केल्याने, स्त्री अस्वस्थ होते आणि नीट खाऊ शकत नाही.
- महिला तिचे कपडे व्यवस्थित करत असल तर त्या वेळी पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. असं करणं चुकीचं आहे. यावेळी माणसाने आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेऊन तिथून नजर हटवली पाहिजे.
- जेव्हा एखादी स्त्री स्वतःला तेलाने मसाज करते, मुलाला दूध पाजत असेल किंवा मुलाला जन्म देत असेल, अशा वेळी पुरुषाने स्त्रीकडे अजिबात पाहू नये.
- जेव्हा एखादी स्त्री डोळ्यात काजल किंवा मेकअप करत असेल तेव्हा पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. महिलांना तयारी करताना पाहून पुरुषांचं लक्ष विचलित होऊ शकत, त्यामुळे पुरुषांनी तिथून दूर जायवा हवं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)