Horoscope Today 20 June 2022 : धनलाभ, उत्साह आणि बरंच काही; पाहा आज कसा असेल तुमचा दिवस

कसा असेल तुमचा आजचा दिवस, 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास  

Updated: Jun 20, 2022, 07:42 AM IST
Horoscope Today 20 June 2022 : धनलाभ, उत्साह आणि बरंच काही; पाहा आज कसा असेल तुमचा दिवस title=

मेष - या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आह. विवाहासाठी इच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगलं स्थळ मिळेल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

वृषभ- आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल. एखादं नवं काम मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. 

मिथुन- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा. 

कर्क- आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला घ्या. अनुभवाने यशाचं उच्च शिखर चढाल. 

सिंह - सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे. संधी गमावू नका. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. 

कन्या- कोरोना फोफावतोय, आरोग्याची काळजी घ्याय कारण नसल्यास उन्हात बाहेर पडू नका. आजचा दिवस शुभ आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल. 

तुळ- शरीरात कोणत्याही प्रकारचं दुखणं असल्यास चिंता करु नका, दुखणं दूर होणार आहे. आरोग्य जपा, धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा. 

वृश्चिक- मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या. 

धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल. 

मकर- वडिलांच्या संपत्तीतील काही भाग आज तुम्हाला मिळणार आहे. अट्टहास आणि अपेक्षा ठेवू नका, येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा. 

कुंभ - नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे. 

मीन- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.