मेष -
आपणास मित्र आणि भाऊ यांचे सहकार्य मिळेल. नवीन कामे सुरू होतील आणि नियोजित कामेही पूर्ण होतील. मालमत्तेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित कराल. तुमचा पराक्रम वाढू शकतो. आपला दिवस कौटुंबिक, वैयक्तिक जीवन आणि पैशाच्या बाबतीत चांगला जाईल. आपल्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा.
वृषभ -
आज आपण कोणताही निर्णय घेऊ नका की कोणताही निष्कर्ष काढत बसू नका. स्वभात उथळपणा दिसून येईल. किंवा थोडीशी गुंतागुंत निर्माण होईल. आजच्या दिवशी तुम्हाला सावध राहावे लागले. तुम्ही आज विचारपूर्वक बोला. जोडीदारासह वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
मिथुन -
नवीन काम आणि नवीन व्यवसायाबाबत एकादा करार होईल. कोणतीही समस्यां सोडविण्यासाठी एक चांगला दिवस असेल. कोणतीही नवीन ऑफर आज मिळू शकते. विचारपूर्वक काम हाती घ्या. समस्या लवकर संपुष्टात येईल.
कर्क -
प्रेम जीवनात गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणाने वागू नका. नोकरी व व्यवसायात निष्काळजीपणाने वा घाईघाईने वागू नका. आज तुम्हाला कोणत्याही कामात अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
सिंह -
आज तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण होणार नाहीत. आज आपण अनेक प्रकारच्या विचारांमध्ये असाल. आज पैसे संभाळून ठेवा. व्यवहार आणि गुंतवणूकीबाबत सावधगिरी बाळगा. आज तुम्ही गोड बोलण्याचा प्रयत्न करा, शक्यतो कठोर बोलणे टाळा. आज एखादी योजना बनवू नका, जुन्या कामाला प्राधान्य द्या.
कन्या -
व्यवसायातील काही नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकते. जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य आणि आनंद मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला असेल. आज काही विचारांची कामे पूर्ण होतील. आपण महत्त्वपूर्ण लोकांना भेटू शकता. धैर्य ठेवा तुमचे आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्नही होईल.
तूळ -
दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. काम करण्यातही तुम्हाला चांगले वाटेल.आज तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात. आपण त्यांचा फायदा घेण्यासाठी तयार असले पाहिजे. अचानक मनामध्ये बदल होऊ शकतात जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. जोडीदाराच्या नात्यात सुसंगतता असेल.
वृश्चिक -
नोकरी व व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागतील. नुकसान देखील होऊ शकते. गोंधळ वाढू शकतो. अचानक एकादे नुकसान होऊ शकते. त्यासाठी तुम्ही तयार राहा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अस्वस्थता व गैरसोय होऊ शकते. जर त्रासदायक परिस्थिती असेल तर आपण त्यास अत्यंत सावधगिरीने सामोरे जावे.
धनु -
आर्थिक बाबी सुटतील. वैवाहिक जीवन आनंददायी असू शकते. आपण जटील गोष्टी करार आणि नम्रतेने हाताळू शकता. नित्यकर्मांमुळे पैशाचा फायदा होतो. तुम्हाला मुलांचा पाठिंबा मिळू शकेल. नवीन लोकांना भेटू शकेल. नोकरीतील अडथळे संपतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
मकर -
आज तुमच्या मनात अशांतता येऊ शकते. आज आपण जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहाल. कोणत्याही समस्येवर तोडगा निघणार नाही. काही खास कामे आज अपूर्ण असू शकतात. तुम्हाला काम केल्यासारखे वाटणार नाही. आपण आता व्यवसायात नवीन करार केले नाही तर ते चांगले आहे. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला असेल.
कुंभ -
ऑफिसमध्ये स्वतःला नियंत्रित ठेवा. आज एकादे पद आपल्याला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी समस्या संपू शकतात. भविष्यातील कामांसाठी योजना बनविणे आपल्यासाठी खूप सोपे होईल. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे, तुम्हाला क्षमता व अनुभवाने काम करावे लागेल.
मीन -
व्यवसायात काहीतरी नवीन करण्याच्या चक्रात आपली समस्या वाढू शकते. आज नोकरी व व्यवसायात घाई करू नका. जोखीम घेण्यासही टाळा. कोणत्याही गोष्टीबद्दल व्यावसायिक जीवनात आपला ताण वाढू शकतो. केलेल्या कामाचा कोणताही परिणाम न मिळाल्यास निराश होऊ नका.