Horoscope 7th December 2021 : मंगळवारी 'या' राशींनी आपला दिनक्रम बदलावा, होईल फायदा

असा असेल आजचा दिवस 

Updated: Dec 7, 2021, 06:39 AM IST
Horoscope 7th December 2021 : मंगळवारी 'या' राशींनी आपला दिनक्रम बदलावा, होईल फायदा  title=

मुंबई : मिथुन राशीसाठी मंगळवार खूप आनंद देणारा आहे. या राशीच्या लोकांची बिघडलेली काम पूर्ण होतील. मालमत्तेतही लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय वृषभ, कर्क आणि मकर राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुंभ राशीच्या लोकांनी रागावणे टाळावे.

मेष : मंगळवारी स्वत:साठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही अनोळखी लोकांची भेट होऊ शकते.

वृषभ : घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल.

मिथुन : चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील.

कर्क : दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनाबद्दल सकारात्मक राहतील.

सिंह: मंगळवारी इतर काय म्हणत आहेत ते ऐका. अधिका-यांची विशेष ओळख करून दिली जाईल. दुसऱ्याला दिलेले पैसे मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूल बदल होऊ शकतात. जोडीदारासोबत काही नवीन नियोजन कराल.

तूळ : राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल. खाद्यपदार्थ व्यापार्‍यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने ताण येऊ शकतो.

वृश्चिक: तुमची उदार भावना लोकांना खूप प्रभावित करेल. तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि सावध रहा. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील.

धनु : तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा कोणताही छंद किंवा कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल. आर्थिक कामात एकाग्रतेने मन शांत राहील. दुकानाशी संबंधित चिंता राहील.

मकर : तुमचा दिवस चांगला जाईल. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.

कुंभ : लहानसहान गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. ऑनलाइन व्यवसाय करत त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवनवीन योजना आखल्या पाहिजेत. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

मीन: मंगळवारी खूप बोलणे होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि वरिष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबी पक्षात सोडवता येतील.