Horoscope : गुरूवारी 'या' 3 राशींच्या लोकांवर येईल संकट

असा असेल आजचा दिवस 

Updated: Sep 2, 2021, 06:41 AM IST
Horoscope : गुरूवारी 'या' 3 राशींच्या लोकांवर येईल संकट title=

मुंबई : गुरूवार वृषभ, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांकरता कठीण असणार आहे. या राशींच्या लोकांची संकटे वाटणार आहेत. त्यामुळे या तीन राशींच्या लोकांनी सावध राहावं. संकटापाठोपाठ या तीन राशींच्या लोकांमध्ये यश आणि आनंद येऊ शकतो. 

मेष : गुरूवार तुम्हाला भरपूर आनंद देऊ शकतो. व्यावसायिक रूपाने आज सक्रिय आणि सतर्क राहा. विदेशात असलेल्या व्यक्तींकडून आर्थिक लाभ मिळेल. 

वृषभ : अनेक क्षेत्रात समस्या दिसतील. आरोग्याकडे लक्ष द्या. भावनात्मक राहू नको संकट येतील. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन : आज काही आव्हानात्मक काम कराल. मात्र शांत राहा. आजचा दिवस महत्वाचा असेल. 

कर्क : व्यावसायिक प्रवास होईल. भाग्य तुमच्यासोबत असेल. याकरता व्यावसायिक संबंध चांगले ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह : शब्द वापरताना सावध राहा. आज मौन बाळगलात तर अधिक फायदा होईल. कौटुंबिक मतभेद असतील. जोडीदाराची तब्बेत आज चिंता वाढवेल. 

कन्या - पिता-पुत्र यांचे संबंध बिघडल्यामुळे डोकेदुखी वाढेल. भावनात्मक विचार करू नका. चिंतेत राहा. परदेशातील लोकांसोबत व्यवहाराचे डिल कराल. 

तूळ : विदेशी व्यापारातील संबंध सुधारतील. प्रवास होईल. अचानक आर्थिक संकट समोर येईल. संयम ठेवा. 

वृश्चिक : आपल्या व्यवसायातून सतत यश प्राप्त होईल. प्रवास होईल. शत्रुत्व वाढवू नका. 

धनू : गुरूवारी तुमचे वर्तन अतिशय सौम्य असेल. वागण्यातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. 

मकर : तुमचा दिवस अधिक चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. मनात सकारात्मक विचार निर्माण होतील.

कुंभ : तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व मिळू देणार नाही, पण तुम्ही त्यांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाल, त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. 

मीन: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या मनात तुमच्या शिक्षकांबद्दल आणि वडिलांबद्दल आदर भावना वाढेल.