मेष- कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर घाई करु नका. आज तुमच्या मनाजोग्या घटना घडणार आहेत. प्रतीक्षा करा. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करा. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव पडू शकतो. तुमच्याहून लहान हुद्द्याच्या व्यक्तींपासून अडचण असेल. पण, त्यावरही मात कराल. कौटुंबीक कामं आटोपण्यावर भर द्या.
मिथुन- दैनंदिन काम आटोपण्यावर भर द्या. जबाबदारी लक्षात घ्या. धैर्यानं वाटचाल करा. सकारात्मक राहा. यश तुमच्या प्रतिक्षेत आहे. आज अचानल लाभ होण्याचे संकेत आहेत.
कर्क- प्रेमसंबंधांमध्ये अनेक गैरसमजुती निर्माण होऊ शकतात. नोकरी किंवा व्यापाराच्या बाबतीत अती घाई करु नका. विचाराधीन कामं पूर्ण होतील.
सिंह- अर्थार्जनात यश मिळणार आहे. जास्तीच्या कामांमध्ये इतरांचं सहकार्य मिळेल. जुने वाद मिटतील. परिस्थितीचा लाभ होण्याची चिन्हं आहेत.
कन्या- आजचा दिवस चांगला आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणा एका नव्या व्यक्तीशी संवाद साधाल. मानसिक स्थिती सुधारेल.
तुळ- तुमची परिस्थिती बदलणार आहे. धैर्यानं निर्णय घ्या. फायदा होणार आहे. कामात आजचा दिवस व्यतीत होईल. संयम राखा.
वृश्चिक- सर्व काम अगदी सहजपणे पूर्ण होतील. कामाकाजात यश मिळेल. सर्वांशी विनम्रतेनं वागा. इतरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत.
धनु- गेल्या काही दिवसांपासून ज्या कामासाठी बेत आखत होतात, ती कामं आज पूर्ण होणार आहेत. काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा.
मकर- बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. मोठे निर्णय घ्या, यश मिळेल. प्रयत्न करा, लाभ होईल.
कुंभ- अडचणींवर मात करा. आर्खित क्षेत्रात प्रगती होईल. एखादी शुभवार्ता कळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील.
मीन- जोडीदाराच्या सहकार्यानं अनेक कामं पूर्ण होतील. धनलाभाचा योग आहे. आजचा दिवस शुभ आहे.