मेष - समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दोन जणांमधील भांडणात अडकण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांचे विचार समजून घेऊन बोला. कामात लक्ष लागणार नाही.
वृषभ - दिवस चांगला आहे. बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याचं म्हणणंही ऐकून घ्या. अधिक चांगल्या कामासाठी मेहनत करावी लागेल.
मिथुन - वायफळ खर्च होऊ शकतो. इनकम आणि खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. कामात व्यस्त राहाल. दिवस चांगला आहे.
कर्क - काम वाढू शकतं. लहान कामातून मोठा फायदा होऊ शकतो. दिवसभर धावपळ होऊ शकते. अनेक विचार सुरु असल्याने काही योजनाही आखू शकता.
सिंह - स्वत:कडे लक्ष द्या. सक्रीय राहाल. तणावाची परिस्थिती असू शकते. तब्येतीची काळजी घ्या. चर्चेतून मार्ग मिळू शकतो.
कन्या - गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न करा. सहनशक्ती ठेवल्यास अनेक समस्या सुटू शकतात. मोठं टेन्शन कमी होऊ शकतं. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
तुळ - जोडीदाराची साथ मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. दिवसभर व्यस्त राहाल.
वृश्चिक - लहान गोष्टीतून सकारात्मक, फायद्याची गोष्ट घडू शकते. उत्साही राहाल. उत्साहाच्या भरात निर्णय घेऊ नका, विचार करुनच पुढे जा. तब्येत चांगली राहील.
धनु - समस्या मार्गी लागू शकतात. दिवस सामान्य आहे. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात.
मकर - आर्थिक चणचण कमी होऊ शकते. सकारात्मक राहा. मित्रांची मदत होऊ शकते. दिवसभर सक्रीय राहाल.
कुंभ - प्रियजनांसोबत वाद होऊ शकतात. इतरांच्या विचारांचा सन्मान करा. कठिण समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.
मीन - विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. यश मिळेल. मोठं टेन्शन कमी होऊ शकतं. सकारात्मक राहा.