राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींकरता आजचा दिवस यशाचा

असा असेल आजचा दिवस 

Updated: Mar 24, 2020, 07:58 AM IST
 राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींकरता आजचा दिवस यशाचा  title=

मुंबई : नक्षत्राप्रमाणे आपल्या राशीतील ग्रह आणि तारे बदलत असतात त्याप्रमाणे आपल्या दिवसात बदलत होत असतात. आजचा दिवस हा काही राशींकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज ठराविक पाच राशींच्या लोकांना भरघोस यश मिळणार आहे. 

मेष - काही कामांमध्ये आज अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनतीमध्ये कुठेही कसूर ठेवू नका. नोकरी बदलण्याचा विचार आज मनात येऊ शकतो. मात्र हा निर्णय अतिशय शांत विचार करून घ्या. नवीन मोबाईल अथवा गाडी खरेदीचा विचार करू शकता. जोडीदाराचा मूड चांगला असेल त्यामुळे तुमचा वेळ अतिशय चांगला जाईल. कौटुंबिक आनंद सर्वात महत्वाचा असेल. 

वृषभ - व्यवसायात आज दामदुपटीने फायदा होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार वर्गाला बढती मिळण्याचे दिवस आहेत. सहकाऱ्यांची साथ मिळेल. अविवाहित लोकांची लव-लाईफ चांगली होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी करिअरच्या दृष्टीकोनातून विचार करतील. कुटुंबासोबत वेळ घालवा तुम्हाला आनंद मिळेल. 

मिथुन - ग्रहांची स्थिती आज तुमच्यासाठी खूप खास आहे. कामात दिवसभर सक्रिय असाल. नोकरीत किंवा व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी दाखवाल. याचा फायदा आगामी काळात नक्की होणार. जोडीदाराच्या साथीने धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - आज कामात काही लोकांच लक्षवेधाल यामुळे ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार नोकरदार वर्ग करू शकतो. रखडलेले पैसे आज मिळण्याचा योग आहे. त्यामुळे दिवस खूप चांगला आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात अतिशय हसरं खेळतं वातावरण असेल. 

सिंह - अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांकडून खूप फायदा होईल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अर्धवट राहिलेली अनेक काम आज होतील. धनलाभ होईल पण हा पैसा आगामी काळासाठी टिकवून ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

कन्या - नोकरी आणि व्यवसायात आज महत्वाचे निर्णय घ्याल. भविष्याची तरतूद म्हणून काही निर्णय घ्यावे लागतील. जोडीदाराकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस शांत आणि आनंददायी आहे. महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. कुणीही सल्ला न विचारता आपलं मत मांडू नका. अनेकदा शांत राहणं फायदेशीर ठरेल. 

तूळ - रखडलेली काम आज पूर्ण होतील. व्यवसायात पुरेसा हातभार न मिळाल्यामुळे गैरसोय होईल. तसेच सहकारी आज कामाला विरोध करण्याची देखील शक्यता आहे. जास्त विचार करू नका. आगामी काळात काही महत्वाचे निर्णय घेतील. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस ठिक असेल. 

वृश्चिक - व्यवसायात आज फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस ठिक असेल. रखडलेली काम आज पूर्ण होण्याचा योग आहे. मोठी जबाबदारी आज येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत फिरण्याचा योग आहे. लवकरच प्लानिंग करा. 

धनू - नोकरीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसाच्या सुरूवातीपासूनच थोडं सावध राहा. कायद्याच्या गोष्टींचा त्रास होईल. कामाच्या निमित्ताने परदेश दौरे होण्याची दाट शक्यता आहे. लवलाइफमध्ये चांगला बदल झाल्याचा दिसेल. या राशीतील अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 

मकर - जुने प्रश्न आज डोकं वर करतील. मकर राशीच्या लोकांच्या ग्रहांची स्थिती आज अनुकूल असेल. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत थोडे खटके उडतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवसासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे. 

कुंभ - करिअर करता आजचा दिवस कुंभ राशीसाठी चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदाच फायदा आहे. काही महत्वाचे आणि चांगले बदल होण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधीत महत्वाचे निर्णय घ्याल. महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. जोडीदारासोबत ठरवून वेळ घालवा.

मीन - अचानक फायदा मिळेल. पार्टनरच्या मदतीने धन लाभ होण्याचा योग आहे. जुनी कर्ज आज संपतील. आगाऊ खर्च टाळा. नवीन जबाबदारी आज येणार आहे त्यामुळे सज्ज व्हा. वातावरणातील बदलाचा फटका आरोग्याला बसेल