राशीभविष्य : आज 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Nov 20, 2020, 07:07 AM IST
राशीभविष्य : आज 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- मित्र आणि कुटुंबीयांची मदत होईल. आर्थिक अडचणी दूर होतील. विचाराधीन कामं पूर्ण होतील. जमिनीच्या कामांवर लक्ष द्या. जोडीदाराची मदत मिळेल.

वृषभ- कोणताही मोठा विचार करु नका अथवा निर्णय़ही घेऊ नका. दिवस सर्वसामान्य आहे. कुटुंबाला जास्त वेळ द्या. 

मिथुन- नवी नोकरी आणि व्यवसायात एखादं नवं वळण येणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडचणींवर मात करा. 

कर्क- प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे. आर्थिक चणचण दूर होईल. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येतील. कोणत्याही कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. 

सिंह- विचाराधीन कमां सहजपणे दूर होतील. कटूतेनं कोणाशीही बोलू नका. एखादा नवा बेत आखण्यात आज यशस्वी ठराल. 

कन्या- व्यवसायात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. जोडीदाराला भेटण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगलं असेल. मन प्रसन्न असेल. 

तुळ- दिवस शुभ आहे. कामात मन रमणार आहे. काही चांगल्या संधी तुमच्यापुढे चालून येतील. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे. 

वृश्चिक -नोकरी आणि व्यवसायामध्ये काही चांगले आणि तितकेच मह्त्वपूर्ण निर्णय घ्याल. वायफळ खर्च कमी करा. 

धनु- आर्थिक अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठराल. संतानयोग आहे. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 

मकर- मनाक बरीच उलथापालथ आहे. काळजी घ्या दिवस शुभ आहे. विचारांचा काहूर दूर सारा. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी यश मिळणार आहे. तुमच्या कामानं वरिष्ठांवर प्रभाव पडेल. संधीचा फायदा घ्या. 

मीन- व्यापार आणि नोकरीत यश मिळणार आहे. नशीबाची साथ आहे. धनलाभाचा योग आहे,.