राशीभविष्य : 'या' राशींसाठी धनलाभ आणि अनपेक्षित आनंदाचा दुहेरी योग

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Nov 19, 2020, 07:07 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींसाठी धनलाभ आणि अनपेक्षित आनंदाचा दुहेरी योग  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची मदत होणार आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. जमिनीचा कागदोपत्री व्यवहार पार पडेल. 

वृषभ- कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विचार करु नका. समोर येणारी संधी ओळखा. दिवस सावधगिरीचा असेल. 

मिथुन- अडचणींवर मात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणत्याही कामात अडचण येणार नाही. दिवस आनंददायी आहे. धनलाभाचाही योग आहे. 

कर्क- प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह- विचाराधीन कामं पूर्ण होतील. एखाद्या मित्राला भेटण्याचा योग आहे. प्रवासाला जाण्याचे बेत आखाल. 

कन्या- साथीदाराच्या सहकार्यानं अनेक कामं पूर्णत्वास न्याल. दिवस आनंददायी आणि शुभ आहे. धनलाभाचा योग आहे. काही अनपेक्षित गोष्टी समोर येतील. 

तुळ- आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. काही इच्छा एकाएकी बदलतील. जोडीदाराची मोठी मदत होणार आहे. 

वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील. पण, त्यायवर तुम्ही मात कराल. 

धनु- आर्थिक चणचण दूर होईल. नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. नोकरीतील अडथळे दूर होतील. 

मकर- आज दिवसभर तुम्हाला सावध रहावं लागणार आहे. काही अपूर्ण कामं मार्गी लागतील. नव्या गोष्टींमध्ये मन रमेल. 

 

कुंभ- तुमच्या अनेक योजना मार्गी लागतील. अनुभव फायद्याचा ठरेल. अडचणींवर मात कराल. 

मीन- नोकरी आणि व्यापारात मोठे निर्णय घेताना घाई करु नका. आरोग्याची काळजी घ्या. निर्णय घेताना मोठ्यांची मतं विचारात घ्या.