Horoscope 16 November 2021 | मंगळवारी या राशींचं नशीब चमकणार, असा असेल दिवस

कसा असेल तुमचा आजचा(Horoscope 16 November 2021) दिवस, वाचा तुमचं राशीभविष्य.

Updated: Nov 15, 2021, 10:35 PM IST
Horoscope 16 November 2021 | मंगळवारी या राशींचं नशीब चमकणार, असा असेल दिवस title=

मेष (Aries) : मंगळवारी प्रामाणिकपणे काम कराल. व्यवहारात सकारत्मकता असेल. पैशांच्या बाबतीत लोभीपणा टाळण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन काम सुरु करयाचा विचार कराल. मुलांसोबत वेळ घालवाल. (Horoscope 16 November 2021 luck of these zodiac signs will shine on Tuesday know your zodiac sign prediction) 

वृषभ (Taurus) : सर्व कामं योग्य मार्गाने कराल. व्यापाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना साक्षी म्हणून कोणाला तरी सोबत ठेवा. अपेक्षित जोडीदार मिळाल्याने तरुण आनंदी राहतील. 

मिथुन (Gemini) : दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असल्यास सावध रहा. कार्यालयीन ठिकाणी दबदबा निर्माण कराल. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत रहाल. 

कर्क (Cancer) : भविष्यकालीन गुंतवणुकीच्या योजनेला पूर्णविराम देऊ शकता. घरात मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरदार वर्ग चांगली कामगिरी करेल. प्रतिस्पर्धी तसेच विरोधी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतील. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळा. 

सिंह (Leo) : व्यावहारिकरित्या निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरेल. दुग्धोत्पदान संबंधीत व्यापार करणाऱ्यांचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. जोडीदाराकडून वैवाहिक जीवनाचा चांगला अनुभव मिळेल. 

कन्या (Virgo) : प्रयत्नाने पुढे जाण्याचा दिवस आहे. व्यापाऱ्यांनी सामाजिक क्षेत्रातील संपर्क वाढवण्यावर लक्ष द्यावं. आर्थिक बाबतीत सावध रहा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत सतर्क रहायला हवं. घरातील वरिष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. 

तुळ (Libra) : कोणत्याही कामात फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारात नवे भागीदार जोडले जाऊ शकतात. आर्थिक समस्येबाबत असलेला ताण काहीसा कमी होईल. वर्क फॉर्म होम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. 

वृश्चिक (Scorpio) : दिवस चांगला असणार आहे. वेळ काढून भविष्यकालीन योजनांवर लक्ष द्या. मालमत्तेसंबंधीत प्रकरण निकाली निघेल. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. देवाच्या आराधनेमुळे मानसिक शांती लाभेल. घरातून बाहेर पडताना सावध रहा. 

धनु (Sagittarius) : आजचा दिवस ठिकठाक असेल. दिनक्रमात बदल करावं लागू शकतो. व्यापाऱ्यांना व्यापारासंबंधीत महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट घ्यावी लागू शकते. वैवाहिक चर्चेत यश मिळाल्याने तरुण उत्साहित असतील. 

मकर (Capricorn) : काही परिस्थितीत तुमची स्थिती प्रतिकूल राहिल. आर्थिक आणि कौटुंबिक स्थितीला आणखी चांगली करण्यासाठी प्रयत्न कराल. पैशांबाबत आणि महागड्या वस्तूंबाबत सावध रहा. तरुणांना अपेक्षित नोकरी मिळेल.  

कुंभ (Aquarius) : तुमच भाग्य फळफळणार आहे. जीवनात सर्व बाबतीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत असेल. व्यापाऱ्यांच्या कायदेशीर बाबींपासून सावध रहा. कार्यालयीन ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य लाभेल.

मीन (Pisces) : तुम्ही असं काही कराल, ज्याचा तुम्ही कधीच विचार केला नसेल. दररोजच्या उत्पन्नात वाढ होईल. महत्तवपूर्ण गोष्टी कोणाला सांगू नका. आईसोबत वेळ घालवण्यासाठी योग्य वेळ आहे.