Hororscope 15 November 2021 | सोमवारी नशीब फळफळेल, या राशीच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी

कसा असेल तुमचा सोमवारचा (Hororscope 15 November 2021) दिवस, वाचा राशीभविष्य. 

Updated: Nov 14, 2021, 10:36 PM IST
Hororscope 15 November 2021 | सोमवारी नशीब फळफळेल, या राशीच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी  title=

मुंबई : सोमवारचा दिवस (Hororscope 15 November 2021) चांगला राहिल. कर्क राशीचे लोकं जे काही कार्य करतील त्यांच्यासह इश्वराची कृपा असेल. मकर राशीचे लोकं आपलं काम उत्तमरित्या पूर्ण करतील. आत्मविश्वासात वाढ होईल. सोमवारचा दिवस कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Hororscope 15 November 2021 Your luck will shine on Monday these zodiac signs will get good news know your astrology prediction)

मेष (Aries) : विद्यार्थीच्या त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील. कुटुंबियांसोबत चांगलं जमेल. उत्साह जाणवेल. तुम्ही सर्वांचे लाडके असल्याने आई-वडील तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील.

वृषभ (Taurus) : उत्तम पद्धतीने कार्यालयीन कामं पार पडतील. तुमचा मूड चांगला राहिल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कुटुंबियांसोबत फिरायला जावू शकता. 

मिथुन (Gemini) : दिवसाची सुरुवात चांगली होईल. आई-वडिलांचं प्रेम लाभेल. पाल्यांकडून सुख लाभेल. धन लाभ होईल. हसता-खेळता दिवस जाईल. बोलण्यावर ताबा ठेवा. वाहन चालवताना सावध रहावं.   

कर्क (Cancer) : सोमवारचा दिवस फार चांगला जाईल. तुम्ही जे काही काम कराल, त्यात ईश्वरीय कृपा राहील. मेहनत आणि कठोर परिश्रमाचं फळ मिळेल. परिवाराकडून सुख लाभेल. हुशारीच्या जोरावर कामात यशस्वी व्हाल.

सिंह (Leo) : भाग्य तुमच्यासोबत आहे. कामात यश लाभेल. वैवाहिक जीवनात सुख लाभेल. जोडीदारसह चांगलं जमेल. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धनलाभ होईल.

कन्या (Virgo) : दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामात धनलाभ होईल. आर्थिक साठवणूक करु शकता. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील. संपूर्ण दिवस उत्साहित राहाल. 

तुळ (Libra) : कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात चांगला प्रगती राहिल. धनलाभ होईल, मात्र अचानक खर्चही होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. शुभ कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे नातेवाईक आणि मित्रांची भेट होईल.   

वृश्चिक (Scorpio) :  शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल. कुटुंबियांकडून शक्य त्या बाबतीत सहकार्य लाभेल. कार्यालयीन ठिकाणी सहाकाऱ्यांपेक्षा आघाडीवर असाल. हुशारीच्या जोरावर कामात यशस्वी व्हाल. प्रमाणापेक्षा संताप व्यक्त केल्यास हाणी होईल. पाल्याच्या मदतीने आनंद द्विगुणीत होईल.

धनु (Sagittarius) : दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. मित्र किंवा कुटुंबियांसोबत कुठेतरी लांब दौऱ्यावर जाल, ज्यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. कार्यालयीन ठिकाणी सर्वांसोबत चांगल्याने वागाल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य लाभेल.

मकर (Capricorn) : कामात सर्वस्व झोकून द्याल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.आत्मविश्वासात वाढ होईल. जोडीदाराकडून आणि पाल्याकडून गूड न्यूज मिळेल.

कुंभ (Aquarius) : हुशारीच्या जोरावर कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. दिवस चांगला जाईल. दिवसाची सुरुवात प्रसन्न राहिल.  कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.

मीन (Pisces) : संपूर्ण दिवस तणावात जाईल. स्वाभावात एकाग्रता दिसून येईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने आत्मशांती लाभेल. दररोजच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल.