Horoscope 16 January 2022 : या 2 राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव येण्याची शक्यता

जाणून घ्या तुमच्यासाठी रविवार कसा असणार आहे

Updated: Jan 16, 2022, 08:29 AM IST
Horoscope 16 January 2022 : या 2 राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव येण्याची शक्यता title=

मुंबई : रविवार तुमच्यासाठी शुभ राहणार आहे आणि कामात फायदा होण्याची शक्यता आहे. कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस तणावपूर्ण असू शकतो. तर जाणून घ्या तुमच्यासाठी रविवार कसा असणार आहे

मेष (Aries)

रविवार तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुम्ही जी काही कामं कराल त्यात तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या मेहनतीचं आणि प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल.

शुभ रंग: मरून

शुभ क्रमांक: 3

वृषभ (Taurus)

रविवारचा दिवस कामासाठी उत्तम राहील. त्याचप्रमाणे मूड चांगला राहील, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. 

शुभ रंग: लाल

शुभ क्रमांक: 7

मिथुन (Gemini)

दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामात धनलाभ होणार आहे. दिवस हसत-खेळत जाईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि गाडी चालवताना काळजी घ्या.

शुभ रंग: पांढरा

शुभ क्रमांक: 1

कर्क (Cancer)

विद्यार्थी त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील. कुटुंबात चांगलं सामंजस्य राहील. तुमच्या मनात नवा उत्साह दिसून येईल. कौटुंबिक आपुलकी चांगली राहील. तुम्ही सर्वांचे लाडके आहात, त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा तुमच्या पालकांकडून पूर्ण होतील.

शुभ रंग: नारिंगी

शुभ क्रमांक: 2

सिंह (Leo)

भाग्य तुम्हाला साथ देईल. कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ मिळण्याचा आनंद मिळेल. या काळात वैवाहिक जीवनातील आनंद तुमच्यासाठी चांगला राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील.

शुभ रंग: जांभळा

शुभ क्रमांक: 8

कन्या (Virgo)

तुमचा दिवस खूप तणावपूर्ण असेल. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि एकाग्रतेची दिसून येईल. कुटुंबासोबत काही क्षण आरामात घालवा. रोजच्या धावपळीने थकवा जाणवेल.

शुभ रंग: लाल

शुभ क्रमांक: 6

तुळ (Libra)

कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचं काम उत्कृष्ट राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल.

शुभ रंग: गुलाबी

शुभ क्रमांक: 2

वृश्चिक (Scorpio)

शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असाल. जास्त रागाने त्रास वाढेल. 

शुभ रंग: बदामी

भाग्यवान क्रमांक: 11

धनु (Sagittarius)

दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. तुम्ही दिवसभर उत्साही असाल.

शुभ रंग: निळा

शुभ क्रमांक: 3

मकर (Capricorn)

तुम्ही कामात तुमचं सर्वोत्तम द्याल, परिणामी तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्यात धैर्य आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमचा जोडीदार आणि मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. 

शुभ रंग : हिरवा

शुभ क्रमांक: 9

कुंभ (Aquarius)

दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या हुशारीचा दाखला देत तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.

शुभ रंग: आकाशी

शुभ क्रमांक: 21

मीन (Pisces)

दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगले वागाल. 

शुभ रंग: राखाडी

शुभ क्रमांक: 3