Horoscope 13 December 2021 : मकर राशी लोंकाच्या हट्टीपणामुळे कुटुंब अडचणीत येईल. कुंभ राशींचं विनाकारण कोणाशीही खटके उडतील. तर बाकी राशींसाठी सोमवार नेहमीप्रमाणे असेल. सोमवरचा दिवस 12 राशींसाठी (Horoscope 13 December 2021) कसा असेल, हे सांगतायेत एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला. (Horoscope 13 December 2021 People of this zodiac should avoid unnecessary arguments fear of loss on Monday)
मेष (Aries) : आजचा दिवस कामासाठी सर्वोत्तम आहे. नव्या मित्राकडून लाभलेल्या सहकार्यामुळे तुमचं काम पूर्ण होईल. तुमचं नशिब फळफळेल.
वृषभ (Taurus) : वडिलधाऱ्यांचा आदर कराल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामातून चांगलं धनलाभ अपेक्षित आहे.
मिथुन (Gemini) : हाती घेतलेलं काम उत्साहाने पूर्ण कराल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून नवं काही शिकता येईल. मन प्रसन्न राहिल.
कर्क (Cancer) : बुद्धीमत्ता आणि हुशारीच्या जोरावर सहजपणे काम पूर्ण कराल. तुमच्या मधुर वाणीने मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर आनंदी असतील. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.
सिंह (Leo) : आजचा दिवस चांगला आहे. मित्रासोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.
कन्या (Virgo) : कामात-व्यवसायात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नशिब तुमच्यासोबत आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहिल.
तुळ (Libra) : आरोग्याबाबत हलगर्जीपणा करु नका. मन लावून काम कराल. मित्राच्या मदतीने तुम्हाला धनलाभ होईल.
वृश्चिक (Scorpio) : तुमच्या विरोधकांना वरचढ होऊ देऊ नका. भाग्य तुमच्यासोबत आहे. कुटुंबिय किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.
धनु (Sagittarius) : सोमवारी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घरी पाहुणे येतील, ज्यामुळे आनंदाचं वातावरण असेल. वडिलधाऱ्यांप्रती मनात आदराची भावना राहिल.
मकर (Capricorn) : समाजातील प्रतिष्ठित लोकांसोबत ओळख होईल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा लाभ होईल. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. उत्साह वाटेल. कामात ध्यान लागेल. भाग्याची साथ मिळेल.
कुंभ (Aquarius) : विनाकारण कोणासोबतही झकाझकी होऊ शकते. प्रकृती स्थिर राहिल. उत्साहाने कामं पूर्ण कराल.
मीन (Pisces) : दिवसाची चांगली सुरुवात होईल. जे काम हातात घ्याल, त्यात यशस्वी व्हाल. सर्वांना सोबत घेतल्याने काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. सकारात्मक विचार कराल.