राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आज आनंदाची बरसात

असा असेल आजचा दिवस 

Updated: Jan 12, 2021, 07:06 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आज आनंदाची बरसात title=

मेष- आज एखाद्या मोठ्या समस्येवर तुम्ही तोडगा काढाल. इतरांना तुमचा अभिमान वाटेल. 

वृषभ- कोणा एका व्यक्तीशी असणारा वाद मिटेल. मतभेद दूर होतील. आयुष्यात आनंदाची बरसात होईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस शुभ आहे. 

मिथुन- इतरांना आदर करण्याची तुमची वृत्ती आज अनेकांचं मन जिंकेल. इतरांची मतं विचारात घेण्याचा प्रयत्न करा. 

कर्क- धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. एखादी नवी जबाबदारी मिळेल. 

सिंह- आज तुम्हाला इतरांच्या सल्ल्याची मदत लागू शकते. आजुबाजूला असणाऱ्या मंडळींकडून तुम्हाला खुप काही शिकायला मिळणार आहे. धनलाभाचा योग आहे. 

कन्या- शत्रूवर मात करण्याची इच्छा अधिक तीव्र होईल. जास्त विचार करु नका. जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. 

तुळ- गैरसमज दूर होतील. विचार करा, अडचणींवर तोडगा मिळेल. नवी जबाबदारी खूप काही शिकवून जाईल.

वृश्चिक - कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 

धनु- इतरांच्या राजकारणात अ़डकू नका. तुमचे निकष तुम्ही आखून पुढे जा. धनलाभाचा योग आहे. 

मकर- मोठ्य़ा अडचणींवर मात करण्यासाठी मित्रांची मदत मिळणार आहे. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. 

कुंभ- इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. धनलाभाचा योग आहे. दिवस आनंददायी आहे. 

मीन- आज जीवनात आनंदाची उधळण होणार आहे. काही नव्या गोष्टी समोर येतील, ज्या नवं वळण तुमच्या जीवनात आणणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x