Horoscope 09 November 2021 | 'या' 2 राशींसाठी मंगळवार डोकेदुखी ठरणार, संकट ओढवण्याची शक्यता

मंगळवारचा दिवस  (Horoscope  09 November  2021)  कसा असेल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य.  

Updated: Nov 8, 2021, 10:02 PM IST
Horoscope  09 November  2021 | 'या' 2 राशींसाठी मंगळवार डोकेदुखी ठरणार, संकट ओढवण्याची शक्यता title=

मुंबई : मिथुन राशींच्या लोकांना सरकारकडून मंगळवारी लाभ मिळू शकतो.तर दुसऱ्या बाजूला सिंह राशीच्या लोकांना कौटुंबिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय मेष, वृषभ आणि कर्क राशीसाठी दिवस मंगळव ठरणार आहे. मंगळवारचा दिवस (Horoscope  09 November  2021) कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजाने दारुवाला यांचे सुपुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope  09 November  2021 Tuesday will be difficult for Leo  trouble may come know your astrology prediction) 

मेष (Aries) : मंगळवारी कामाच्या ठिकाणी नव्या समीकरणांमुळे दिवसभर बिजी असाल. रखडलेली कामात वेग येईल. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच अपेक्षित ठिकाणी बदली मिळू शकते. 

वृषभ (Taurus) :  आरोग्य चांगलं राहिलं. कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हं आहेत. नातेवाईक आणि मित्रांसह असलेल्या नात्यात सुधारणा होऊ शकते.    

मिथुन (Gemini) :  सरकारकडून मंगळवारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाभ मिळू शकतो. वेळेचा सदुपयोग केल्यास व्यवसायामुळे भविष्यात अधिक लाभ मिळू शकतो. 

कर्क (Cancer) : आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ झालेली जाणवेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकं बैठकांमध्ये सहभागी होतील. सन्मान प्राप्त होईल. जबाबदारी मिळेल. किचकट समस्या निकाली काढाल. 

सिंह (Leo) : तुमच्यासाठी शुभ वेळ नाही. कौटुंबिक जीवनात भाऊ-बहिणीशी वादामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते. प्रेम संबंधात यशस्वी व्हाल. कठोर मेहनतीने वरिष्ठांना संतुष्ठ कराल. आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या (Virgo) :   व्यवसायिक योजनांबाबत सकारात्मक दृष्टीकोन असेल. भविष्यात पूर्णपणे यश प्राप्त कराल. न्यायलयीन निकाल तुमच्या बाजूने लागण्याची चिन्हं आहेत.   

तुळ (Libra) :  मंगळवारी संमिश्र स्वरुपाचे परिणाम मिळतील. काही निर्णय हे तुमच्या बाजूने जातील. घेतलेल्या निर्णयांवर अधिक लक्ष द्यावं. गुंतवणूक करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.    

वृश्चिक (Scorpio) : व्यवसायिक क्षेत्रात चांगले निकाल मिळतील. प्रभावशील लोकांसोबत असलेला संपर्क फायदेशीर ठरेल. व्यवसायिकांना भागीदारीमुळे अधिक लाभ मिळू शकतो. आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.    

धनु (Sagittarius) : तुमच्यासाठी मंगळवार वादग्रस्त ठरु शकतो. वरिष्ठांच्या रागाचा सामना करावा लागेल. तसेच सहकारी तुमच्यात असलेल्या उणीवेचा गैरफायदा घेऊन आणखी अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करतील.

मकर (Capricorn) : कामासंबंधी केलेल्या दौऱ्यांचा सकारात्मक फायदा होईल. प्रभावशील लोकांसोबत संपर्क निर्माण होईल. प्रेमसंबधात भाग्य तुमच्यासोबत असेल.  

कुंभ (Aquarius) : जोडीदाराकडून अर्धवट सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही निकषापर्यंत पोहचू शकणार नाहीत. या स्थितीमुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. तुम्ही अडचणीत आहात, याची कोणालाही माहिती होऊ देऊ नका.

मीन (Pisces) : प्रभावशील लोकांशी संपर्क निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नव्याने भागिदारीसाठी योग्य वेळ आहे. कामानिमित्ताने केलेल्या दौऱ्याचा फायदा होईल.