Benefits of Holi Ash Astro Tips in Marathi : होळीचा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहे. ज्यामध्ये राक्षसी होलिका भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसली होती. होलिका वाईट शक्तीचं प्रतिक तर भक्त प्रहाद हा चांगल्या शक्तीचं प्रतिक मानलं जातं. म्हणून होळीच्या एक दिवस आधी फाल्गुन पौर्णिमा तिथील होलिका दहन केलं जातं. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. यंदा होलिका दहन हे 24 मार्चला असणार आहे. तर 25 मार्चला रंगांचा उत्साह होळी देशभरात साजरी करण्यात येणार आहे. होलिका दहनाच्या दिवशी लाकडे, शेणाच्या गोवऱ्या इत्यादीने होळी उभी केली जाते आणि मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून पूजा केला जाते. त्यानंतर होळी पेटवली जाते. होळीची राख ही वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. (Holika Dahan 2024 Vibhuti Benefits of Holi Ash and Holika Dahan upay Astro Tips in Marathi)
डॉ. जया मदन हिने होलिका दहनाचा शुभ आणि सकारात्मक दिवस तुमच्या आयुष्यासाठी कशा भाग्यशाली करता येईल याबद्दल सांगितलं आहे. डॉ. जया मदन सांगतात की, होळीची राख एका डब्बीत घेऊन या आणि ती घरात दक्षिण पूर्व दिशेला ठेवा. या उपायामुळे तुमचं आणि घरातील लोकांचं वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं.
तसंच होळीची राख थोडीशी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा. त्यासोबत कपाळ आणि मानेला ती राख लावल्यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो.
त्यासोबत होलिका दहन सुरु असताना त्याच्या जवळ चौरमुखी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. नंतर हा दिवा घरात आणा आणि उत्तर से दक्षिण दिशेला आरती करुन दक्षिणेला ठेवून द्या. या उपायामुळे समृद्धी तुमच्या घरात प्रवेश करुन कायम स्वरुपी राहिल. अशा प्रकारे तुम्ही होलिका दहनाचा हा शुभ आणि सकारात्मक दिवसाला उपाय केल्यास आयुष्यात सकारात्क ऊर्जा आणि आनंद मिळवू शकता.
होळीची राख अंगाला लावल्यास अनेक फायदे होतात. ही राख अंगाला लावल्यामुळे आजाराची लागण होणार नाही, असं आयुर्वैदात सांगण्यात आलंय. त्यासोबत पुरळ, खरुज, त्वचेचे इन्फेक्शनापासून तुमचं संरक्षण होतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)