Hanuman Jayanti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान जयंतीला कर्माचा दाता शनिदेवाचा दुर्मिळ योग निर्माण होणार आहे. तब्बल 10 वर्षांनी हा योगायोग जुळून आला असून षष्ठ रायजोग काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. संकटमोचन हनुमानजीची पूजा केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असा विश्वास आहे. त्याशिवाय या षष्ठ राजयोगामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो, वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. शिवाय यादिवशी शनि प्रकोप आणि मंगळ दोष मुक्तीसाठी उपाय सांगण्यात आलंय. (hanuman jayanti 2024 saturn Shash Rajyog Sadesati on these zodiac signs be less and shani mangal dosh astrological remedies)
हनुमान जयंती आणि शनिचा राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला सिद्ध होणार आहे. या लोकांना साडेसातीपासून आराम मिळणार आहे. पुढील एक महिन्या या लोकांची प्रगती होणार आहे. व्यावसायिकांना फायदा होणार आहे. तर अकडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. नवीन लोकांशी ओळख होणार आहे.
हनुमान जयंती आणि शनिदेवाच्या कृपेने या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. कार्यक्षेत्रात सहकारी सहकार्य करणार आहे.
हनुमान जयंती आणि शनिदेवमुळे या लोकांचे सर्व काम वेळेत होणार असून त्यात त्यांना यश मिळणार आहे. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होणार आहे. कुटुंबातही आनंद असणार आहे.
मेष रास राशीचा स्वामी मंगळ असून मंगळवार हा हनुमानजींना समर्पित करण्यात आलाय. मंगळ दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंती आणि मंगळवारी, शनिवारी हनुमानची आराधना करा.
सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. भगवान हनुमानाचे गुरु हे सूर्य देव असल्याने हनुमानजींचा आशीर्वाद त्यांच्या गुरूंच्या राशीवर कायम असतो. जीवनात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी सूर्यदेवाची पूजा करणे तुम्हाला लाभदायक ठरते.
तर कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना देखील भगवान हनुमानाचा आशीर्वाद कायम असतो. पौराणिक आख्यायिकेनुसार शनिदेवाने सांगितले होते की, हनुमानजींची पूजा केल्याने लोकांना शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून हनुमानजी आणि शनिदेव यांना तिळाच तेल अर्पण केलं जातं.
वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ असून हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला लाडू अर्पण केल्यास फायदा मिळतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)